जळगाव मिरर | १७ जुलै २०२३
राज्याच्या राजकारणात राष्ट्रवादी पक्ष मोठी खळबळ उडवत असल्याचे चित्र गेल्या तीन आठवड्यापासून दिसत असतांना आज राज्याचे विधानसभेचे अधिवेशन सुरू झाले असून या पार्श्वभूमिवर राज्यात वेगवेगळ्या घडामोडी पाहायला मिळत आहेत.
त्यानंतर आज पुन्हा सलग दुसऱ्या दिवशी अजित पवारांच्या गोटातील आमदारांनी शरद पवाराची भेट घेतली. विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन, राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांनी एकमेकांना बजावलेले व्हीप तथा विरोधी पक्षांच्या बंगळुरूतील बैठकीच्या पार्श्वभूमीवर या भेटीगाठी होत असल्यामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ माजली आहे.