जळगाव मिरर |३१ जुलै २०२३
राज्यातील भाजप , शिंदेंची शिवसेना व अजित पवारांची राष्ट्रवादी हे तिन्ही पक्ष मिळून राज्याची सत्ता हाकत असतांना ठाकरे गटासह कॉंग्रेस व राष्ट्रवादी सत्ताधारीवर नियमित ताशेरे ओढत असतांना दिसून येत आहे. तर या तिन्ही पक्षातील आमदार मंत्री पदासाठी रांगेत उभे असल्याचे देखील चर्चा जोर धरीत आहे. त्यासाठी राज्यात पुन्हा एकदा मंत्री मंडळ विस्ताराच्या हालचाली जोरदार सुरु झाल्या आहे.
एकनाथ शिंदे गटात तसेच भाजपच्या गोटात देखील मंत्रिपदासाठी रांगेत असलेले काही आमदार नाराज झाल्याच्या चर्चा समोर आल्या. दरम्यान आता या सर्व नाराज आमदारांसाठी आनंदाची बातमी समोर आली असून लवकरच राज्यात पुन्हा मंत्रीमंडळ विस्तार होणार असल्याची माहिती समोर आली आहे. शिंदे-फडणवीस सरकारचा चौथा आणि शिंदे-फडणवीस-पवार सरकारचा दुसरा शपथविधी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सध्या विधीमंडळाचे पावसाळी अधिवशन सुरू आहे. हे अधिवेशन संपताच मंत्री मंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यात १५ ॲागस्टच्या आत नवीन पालकमंत्र्यांची घोषणा होऊन जिल्ह्यांना नवीन पालकमंत्री मिळण्याची शक्यता आहे.