जळगाव मिरर / १४ फेब्रुवारी २०२३
जळगाव जिल्ह्यात विविध सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असलेले रिद्धीजान्हवी फाउंडेशनच्या अध्यक्षा चित्रलेखा कांतीलाल मालपाणी यांना नुकतेच पुणे येथे राष्ट्रभक्ती जनविकास संघटना, भारत “आयोजित स्वांतत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्त ‘राष्ट्रभक्ती महाराष्ट्र’ गौरव पुरस्काराणे सन्मानित करण्यात आले.
आज़ादी का अमृत महोत्सव दरम्यान रिद्धी जान्हवी फाऊंडेशनच्या अध्यक्षा सौ.चित्रलेखा मालपाणी यांनी क्षेत्रामध्ये आजपर्यंत केलेल्या व करत असलेल्या उल्लेखनिय कार्याबद्दल त्यांना राष्ट्रभक्ती महाराष्ट्र गौरव राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. संयोजन समीतीने त्यांची निवड केलेली होती. रविवार दिनाक. १२ फेब्रुवारी २०२३ रोजी कार्यक्रम डॉ. नितु मांडके आय. एम. ए. हाऊस, शुक्रवार पेठ, क्षेत्रीय कार्यालय शेजारी टिळक रोड, पुणे. येथे आयोजित केला गेला होता.कार्यक्रमाला खा.राजू शेट्टी, ,ना. बच्चु कडु, डॉ. ज्योतीताई विनायकराव मेटे, ,पद्मश्री डॉ. पोपटराव पवार, पुणे ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजेते डॉ. अविनाश सकुंडे, श्री. जमाने (पाटील) निमंत्रक सुनिल सुरेश गोरे राष्ट्रभक्ती जनविकास संघटना यांच्यासह आदी पदाधिकारी उपस्थित होते. त्यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
