जळगाव मिरर / २८ फेब्रुवारी २०२३ ।
जळगाव शहरातील गणेश कॉलनी परिसरातील रोझलँड इंग्लिश मीडियम शाळेत दिनांक २७ रोजी हस्तकला प्रदर्शन महोत्सव आयोजित करण्यात आला. या हस्तकला प्रदर्शनात बालकलाकारांनी आपल्या बालकलेचे प्रदर्शनाला पालकांनी मोठा प्रतिसाद देत बालकांचे कौतुक केले.
शाळेतील विद्यार्थांनी वेगवेगळ्या चित्रकला , हस्तकला , छोटे छोटे प्रकल्प, कलर डे निमित्ताने शिकलेली गाणी ,चित्रकला ही माहिती ही मुलांनी पालकांना सादर केली यांचे उत्तम सादरीकरण केले. हे प्रदर्शन पाहण्यासाठी पालकांचा प्रतिसाद ही वाखाणण्याजोगे होता. संस्थेच्या अध्यक्षा रोजमीन खिमानी प्रधान यांनीही बाल कलाकरांना मार्गदर्शन केले. खिमानी प्रधान बोलतांना म्हणाले कि, बाल कलाकारांना त्यांच्यातील सुप्त कला गुणांना या कागदावर उतरविण्याचा प्रतिसाद देण्यात यावा. कला ही अशी गोष्ट आहे की शिक्षणात एकाग्रता निर्माण करते. कलेची जोड असली की अभ्यास सोपा व मजेशीर होतो हे पालकांना प्रत्यक्ष रित्या समजावले. त्याचप्रमाणे नेहा विनीत जोशी यांनी कार्यक्रमाचे व्यवस्थापन पाहिले.
