जळगाव मिरर / १९ फेब्रुवारी २०२३
येथील गाडगेबाबा क्रीडा व बहूउद्देशीय संस्थेतर्फे श्री संत गाडगेबाबा प्रीमियर लीग स्पर्धेला रविवार दि. १९ फेब्रुवारी रोजी सुरुवात झाली आहे. पहिल्या दिवशी तीन रोमांचक सामने झाले. सोमवारी स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे.
श्री संत गाडगेबाबा प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये डेबूजी रॉयल्स व डेबुजी वॉरियर्स संघातील पहिला सामना सागर पार्कवर राष्ट्रगीताने सुरुवात करण्यात आला. पहिल्या सामन्याची नाणेफेक माजी नगरसेवक चेतन शिरसाळे यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून सचिन सोनवणे, अविनाश देवरे, दीपक बाविस्कर, मनोज निंबाळकर, संतोष बेडीस्कर, सागर महाले, प्रवीण आढाव, हेमंत सूर्यवंशी, मयूर थोरात, गणेश सुरसे, सुधीर सुरसे, कमलाकर देवरे, अमर निंबाळकर उपस्थित होते.
पहिल्या सामन्यात डेबुजी वॉरियर्स संघाने चुरशीने सात धावांनी सामना जिंकला. त्यानंतर दुसरा सामना परीट सुपर किंग आणि धोबीपछाड संघात झाला. यात धोबीपछाड संघाने ५१ धावांनी परीट किंगला मात दिली. तर तिसऱ्या सामन्यात धोबी किंग मेहरूण संघ विरुद्ध जय गाडगे संघांमध्ये झालेल्या सामन्यात जय गाडगे संघ पाच गड्यांनी विजयी झाला. सर्व सामने २२ तारखेपर्यंत सुरू राहतील. सोमवारी २० रोजी आ.सुरेश भोळे यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन सकाळी होणार आहे. दिवसभरात ८ सामने दिवसरात्र खेळले जातील.
