अमळनेर : विक्की उत्तम जाधव
रोटरी क्लब अमळनेरतर्फे श्रीराम नवमी व पवित्र रमजान महिन्याचे औचित्य साधून ३० मार्च २०२३रोजी प्रोटीन सप्लीमेंट किट व सकस आहाराचे २९ गरजूना वाटप करण्यात आले. गेल्या दोन वर्षांपासून रोटरी क्लब अमळनेर शहरातील एड्स सह जगणाऱ्या अनाथ मुलांसाठी आधार बहुद्देशीय संस्थेच्या माध्यमाने हा प्रकल्प राबवित आहे. यामध्ये बालगोपालांचे व तरुणांचे आरोग्य सुदृढ करण्यासाठी व त्यांचे जीवन सुकर करण्यासाठी रोटरी क्लब अमळनेर प्रयत्नशील आहे व त्याला योग्य असा प्रतिसाद ही मिळत आहे. या महिन्याचे प्रोटीन सप्लीमेंट किट रोटरी परिवारातील दानशूर केले कुटुंबीयांकडून देण्यात आले होते.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून धर्मा प्रोव्हिजन यांचे संचालक श्रीधर्मा सेनानी व छाजेड प्रोव्हिजनचे संचालक श्री गौरव छाजेड तर रोटरी तर्फे रोटरी माजी प्रेसिडेंट रो अजय भाऊ केले,क्लब सेक्रेटरी ताहा बुकवाला,रो प्रोजेक्ट चेअरमन रो राजेश जैन ,रो प्रतीक जैन रो महेश पाटील व बहुउद्देशीय आधार संस्थेतर्फे अध्यक्ष डॉ भारती पाटील , सौ रेणू प्रसाद कार्यकारी संचालक, अश्विनी भदाणे, संजय कापडे तौसीफ खान ,दीप्ती शिरसाठ, मयूर गायकवाड ,निकिता पाटील, पुनम पाटील, साधना बडगुजर, मीनाक्षी राणे आदींनी सदर प्रकल्प यशस्वी करण्याकरिता विशेष प्रयत्न केले अशी माहिती रोटरी पी. आर.ओ. रो मकसूद बोहरी व रो आशिष चौधरी कळवितात.