• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home राजकीय

माझ्या आमदाराला विचारायचे पक्ष घेताय का ? राज ठाकरे !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
February 27, 2023
in राजकीय, राज्य
0
माझ्या आमदाराला विचारायचे पक्ष घेताय का ? राज ठाकरे !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर / २७ फेब्रुवारी २०२३ ।

सध्या कुठला आमदार कुठल्या पक्षात आहे हेच कळत नाही. पूर्वी सगळ्या गोष्टी आमने-सामने व्हायच्या. असा महाराष्ट्र कधीही नव्हता. महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल झाला आहे, अशी खंत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केली. साऱ्या राजकीय परिस्थितीवर 22 मार्चला गुढीपाडव्याच्या सभेत सिनेमा दाखवणार आहे, असा इशाराही राज ठाकरे यांनी यावेळी दिला. त्यामुळे आता या सभेत ते काय बोलणार, याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.

कुसुमाग्रज उर्फ विष्णू वामन शिरवाडकर यांच्या जयंतीदिनी आज मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात येतो. त्यानिमित्त पनवेल येथे राज ठाकरे यांची मुलाखत घेण्यात आली यावेळी ते बोलत होते. मुलाखतकाराने यावेळी राज ठाकरे यांना महाराष्ट्राच्या राजकीय परिस्थितीवर प्रश्न विचारला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा एक आमदार आहे. त्यांनी पक्षावर दावा सांगितला तर, यावर राज ठाकरे यांनी खुसखुशीत भाष्य केले. ते म्हणाले की, म्हातारी मेल्याचे दुःख नाही, पण काळ सोकावतो आहे. महाराष्ट्रात जे काही सुरू आहे, त्यावर सविस्तर गुढीपाडव्याच्या सभेत बोलणार आहे.

राज ठाकरे पुढे म्हणाले की, असा महाराष्ट्र कधीही नव्हता. पूर्वी सगळ्या गोष्टी आमने-सामने असायच्या. बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राच्या अनावरणासाठी विधानभवनात गेलो होतो. त्यावेळी सगळे बसले होते. मला कळतच नव्हते कोण कोणत्या पक्षातला. सध्या कोणी आमदार आला की कुठल्या पक्षाचा हे विचारावे लागते. मला राजू पाटीलला ही विचारून पाहायचे आहे. पक्ष घेता का म्हणून? दिवसरात्र आम्ही बरनॉल लावत असतो. आमचे जे जळते आहे, ते तुम्हाला कळणार नाही.

राज ठाकरे म्हणाले की, मी आता लतादीदींचे पुस्तक करतोय. त्यांच्या वाढदिवशी हे पुस्तक आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. यात फोटोबायोग्राफी नाही. या पुस्तकाबद्दल नंतर सांगेन, असे ते म्हणाले. मराठा दैनिकाचे नाव आणि हक्क घेऊन ठेवलेत का, असा प्रश्न विचारला असता राज म्हणाले की, मी हक्क मागायला गेलो होते. मात्र, त्यांनी दिले नाहीत.

राज ठाकरे म्हणाले की, सध्या वर्तमानपत्र मीच वाचत नाही. चॅनल, वर्तमानपत्रे जाहिरातीवर चालतात. वर्तमापत्र काढण्याचे आता बघू पुढे. मराठी नियतकालिके बंद पडत असल्याबद्दलही त्यांनी खंत व्यक्त केली. मराठी माणसांनी मोठ्या प्रमाणात वाचन वाढवले पाहिजे. वर्तमानपत्रे, मासिक, साप्ताहिके जगवली पाहिजे. त्या लोकांनीही तसा खुराक दिला पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.
सध्या सगळ्या गोष्टी मोबाइलवर मिळत आहेत. मी खरेच सांगतो. मी खूप वाचतो-बिचतो नाही. मात्र, वाचले पाहिजे. नाही तर विचारांना तोकडेपणा येतो. मुलांशी बोलताना त्यांना आपल्या आई-वडिलांकडे विचारांचा तोकडेपणा आहे, असे कळले की ते बाहेर शोधतात, असे निरीक्षणही राज ठाकरे यांनी नोंदवले. राज ठाकरे पुढे म्हणाले की, तुमची मुळात ओळख काय? मी कोणय? तुम्ही कोण आहात? तर तुम्ही मराठी आहात. मराठी म्हणजे कोण? तर मराठी भाषा बोलणारा व्यक्ती आहे. भाषा तुमची ओळख असते. त्यामुळे तुम्ही जगात ओळखले जाता. मी फ्रान्समध्ये राहतो. त्याला अर्थ नाही. मला फ्रेंच बोलता आले पाहिजे, असे उदाहरणही त्यांनी दिले.

Related Posts

जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अविनाश भालेराव यांचा पदग्रहण सोहळा उत्साहात !
जळगाव ग्रामीण

जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अविनाश भालेराव यांचा पदग्रहण सोहळा उत्साहात !

June 5, 2026
धरणगावात मोफत नेत्रशिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; शेकडो नागरिकांनी घेतला लाभ
जळगाव

धरणगावात मोफत नेत्रशिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; शेकडो नागरिकांनी घेतला लाभ

May 30, 2026
बेरोजगारांना डावलून ‘खास’ अधिकाऱ्याच्या सुनेला १७ लाखांची कंत्राटे !
सामाजिक

बेरोजगारांना डावलून ‘खास’ अधिकाऱ्याच्या सुनेला १७ लाखांची कंत्राटे !

May 29, 2026
विधान परिषदेसाठी भाजपमध्ये रस्सीखेच; एकनिष्ठांना मिळणार का न्याय?
जळगाव

विधान परिषदेसाठी भाजपमध्ये रस्सीखेच; एकनिष्ठांना मिळणार का न्याय?

May 28, 2026
रावेर हादरलं : महाविद्यालयीन युवतीला बेशुद्ध करून आळंदीत नेलं; जबरदस्ती लग्न आणि अत्याचार
राज्य

रावेर हादरलं : महाविद्यालयीन युवतीला बेशुद्ध करून आळंदीत नेलं; जबरदस्ती लग्न आणि अत्याचार

May 28, 2026
17 विधान परिषद जागांसाठी रणधुमाळी; जळगावात इच्छुकांची मोर्चेबांधणी सुरू !
जळगाव

17 विधान परिषद जागांसाठी रणधुमाळी; जळगावात इच्छुकांची मोर्चेबांधणी सुरू !

May 18, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
डमी ग्राहकाच्या सापळ्यात उघड झाला एचटीबीटी बियाण्यांचा काळाबाजार

डमी ग्राहकाच्या सापळ्यात उघड झाला एचटीबीटी बियाण्यांचा काळाबाजार

June 6, 2026
सावखेडा वाळू प्रकरणात मोठी कारवाई; मंडळाधिकारी व तलाठी निलंबित, तहसीलदारांवरही कारवाईची टांगती तलवार!

सावखेडा वाळू प्रकरणात मोठी कारवाई; मंडळाधिकारी व तलाठी निलंबित, तहसीलदारांवरही कारवाईची टांगती तलवार!

June 6, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

धक्कादायक : २४ वर्षीय रिक्षाचालकाची राहत्या घरात संपविले आयुष्य !

June 6, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group