जळगाव मिरर / १२ फेब्रुवारी २०२३
शहरातील मूळजी जेठा महाविद्यालयाच्या सोहम् डिपार्टमेंट ऑफ योग अँड नॅचरोपॅथी विभागाच्या वतीने हरीविठ्ठल नगरातील जिजामाता माध्यमिक विद्यालयात सोमवार १३ फेब्रुवारी रोजी पासून सात दिवसांच्या मोफत शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील मुळजी जेठा महाविद्यालयाच्या सोहम डिपार्टमेंट ऑफ योग अँड नॅचरोपॅथी विभागाच्या वतीने शैक्षणिक अभ्यासक्रमाचा शैक्षणिक भाग म्हणून असलेल्या सात दिवसीय नि:शुल्क योग शिबिराचे आयोजन हरीविठ्ठल नगरातील जिजामाता माध्यमिक विद्यालयात आयोजन करण्यात आले आहे. हे शिबीर १३ फेब्रुवारी ते २१ फेब्रुवारीपर्यंत दुपारी ४ ते ५ वाजे दरम्यान घेण्यात येणार आहे. या शिबिरात विद्यार्थ्यांना सोहम डिपार्टमेंट ऑफ योग अँड नॅचरोपॅथी विभागाचे संचालक प्रा.डॉ. देवानंद सोनार यांच्या मार्गदर्शनाखाली योगशिक्षिका सुनीता बडगुजर आणि पूजा सोनवणे हे विविध योगाची आसने, प्रणायम घेवून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहे.