अमळनेर : विक्की उत्तम जाधव
पंचायत समितीचे माजी सभापती कै. दिनकर भदाणे यांच्या स्मरणार्थ त्यांच्या परिवाराने मारवड जि. प. शाळेस अकरा हजार पाचशे रुपयांची पुस्तकं भेट दिली.पुस्तकांमध्ये बालकथा, चित्ररुपी गोष्टी, इसापनीती, क्रांतिकारकांच्या गोष्टी,थोर वैज्ञानिक असे मराठी व इंग्रजी माध्यमाची पुस्तके आहेत.

या पुस्तकांचे विद्यार्थ्यांनी वाचन करून वाचनात आवड निमार्ण व्हावी यासाठी ही पुस्तके दिली आहेत असे म्हटले.या अनोख्या उपक्रमाची गावात चर्चा असून इतर नागरिकही या उपक्रमाकडे वळतील अशी अपेक्षा शाळेच्या शिक्षकांनी व्यक्त केली आहे.
कार्यक्रमाला विजय भदाणे, शांताराम साळुंखे, अरुण साळुंखे, उपसरपंच भिकन पाटील, प्राचार्य एल. जे. चौधरी रवींद्र बोरसे, ग्लोबल इंग्लिश मिडीयमचे चेअरमन प्रकाश मुंदडे उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक शिक्षिका यांनी परिश्रम घेतले व भदाणे कुटुंबियांचे आभार मानले आहेत.