जळगाव मिरर | १८ ऑगस्ट २०२४
संत गाडगेबाबा बेघर निवारा केंद्र येथे नारीशक्ती बहुउद्देशीय संस्थेतर्फे रक्षाबंधन सणाच्या पूर्व दिवशी निराधार आजोबांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्याचं अतिशय पुण्याचं काम नारीशक्तीतर्फे करण्यात आलं..
निराधार वृद्ध आजोबांकडे कोणी ढुंकूनही पाहत नाही. आपले उरलेले जीवन कसेतरी कंठत आहेत. अशा आजोबांना एक आशेचा किरण दाखवण्याचं काम नारी शक्ती तर्फे केले जात आहे..आपणही कुणाचं रक्षण करू शकतो अशी भावना त्यांच्या चेहऱ्यावर आज दिसत आहे.जळगाव येथील बेघर निवारा केंद्रातील निराधार आजोबांना राखी बांधून त्यांच्या मरगळलेल्या आयुष्यात नवचैतन्य निर्माण करण्याचं काम जळगाव येथील नारीशक्ती संस्थेतर्फे करण्यात आलं.
याप्रसंगी अध्यक्ष सौ मनिषा पाटील, सचिव श्रीमती ज्योती राणे, कार्याध्यक्ष नूतन तासखेडकर, वंदना मंडावरे, हर्षा गुजराती, नेहा जगताप, संगीता चौधरी, श्रावणी पाटील ,योगिता बाविस्कर,व्यवस्थापक मनोज कुलकर्णी, काळजीवाहक सौ शीतल काटे हे उपस्थितीत होते..सूत्रसंचलन ज्योती राणे व आभार मनोज कुलकर्णी यांनी मानले.