मेष –
आजचा दिवस तुमच्यासाठी आव्हानात्मक असेल. नोकरदार लोकांना ऑफिसमध्ये कामाच्या दबावाला सामोरे जावे लागेल. तुमच्या जबाबदाऱ्या आज वाढतील. तुम्हाला काम वेळेवर पूर्ण करावे लागेल. व्यवसाय करणाऱ्या लोकांना आज आव्हानांना सामोरे जावे लागेल. वैवाहिक जीवन आनंदी राहिल. प्रेम जीवनासाठी वेळ काढाल. आज भाग्य ७६ टक्के तुमच्या बाजूने असेल. भगवान श्रीकृष्णाची पूजा करा
वृषभ
आज तुमच्या जीवनात सुख-समृद्धी येईल. सर्व नियोजित कामे पूर्ण होताना दिसतील. राजकारणाच्या दिशेने काम करणाऱ्यांना विरोधकांना सामोरे जावे लागेल. नवीन काम करण्यासाठी आज वेळ अनुकूल नसेल. आज काम लवकर संपवाल. ज्यामुळे तुमचे मन शांत राहिल. आर्थिक स्थिती मजबूत होईल.
मिथुन
आजचा दिवस तुमच्यासाठी सामान्य असेल. तुम्हाला मुलांकडून चांगली बातमी ऐकायला मिळेल. तुमचे मनोबल वाढवण्यासाठी जास्त उत्साहाने काम करावे लागेल. आज कामात बॉसकडून प्रशंसा होईल. नोकरीत बढतीची शक्यता आहे. उत्पन्नाचे नवीन स्त्रोत तयार होतील. व्यवसायासाठी नवीन करार निश्चित होईल.
कर्क –
आज शुभ कार्यात तुमची रुची वाढेल. तुमच्या व्यवसायासाठी काही निर्णय घ्याल. भविष्यात तुम्हाला फायदा होईल. आज व्यवसायात कोणावरही विश्वास ठेवू नका. मालमत्ता खरेदी करताना काळजीपूर्वक व्यवहार कराल. मुलांच्या लग्नातील अडथळे दूर होतील. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. विद्यार्थ्यांना शिक्षकांचा आशीर्वाद मिळेल.
सिंह
आज तुमचे काम पूर्ण होईल. विरोधकांचे डावपेच अयशस्वी होतील. तुमची सर्व काम वेळेवर पूर्ण होतील. सांसारिक सुखसोयींवर पैसे खर्च होऊ शकतात. आज काही नवीन काम करण्याचा विचार करत असाल तर विचारपूर्वक निर्णय घ्या. कुटुंबात बराच काळ सुरु असलेली कटुता संपेल.
कन्या
आज तुम्हाला मुलांचा अभिमान वाटेल. बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेल्या गोष्टी आज तुम्हाला मिळतील. वैवाहिक जीवन आनंदी राहिल. धार्मिक कार्यात लक्ष केंद्रित कराल. ज्येष्ठांचा सेवा कराल. शुभ कार्यात पैसे खर्च कराल. ज्यामुळे मनात आनंदाची भावना राहील. व्यवसायात आज प्रतिस्पर्धी डोकेदुखी ठरेल.
तुळ
आज तुमची धावपळ होईल तसेच पैसे खर्च होतील. आज कठोर परिश्रम करुन उत्पन्न कमी आणि पैसे जास्त खर्च होतील. विनाकारण धावपळ केल्याने मानसिक आणि शारिरीकदृष्ट्या त्रस्त असाल. कुटुंबासोबत वेळ घालवल्याने थकवा दूर होईल. जोडीदाराचा पाठिंबा मिळेल.
वृश्चिक
आज नोकरी किंवा व्यवसाय करणाऱ्यांना अधिक मेहनत घ्यावी लागेल. मेहनतीनुसार आज फळ मिळणार नाही. त्यामुळे मनात निराशा येईल. तुमचे काम प्रामाणिकपणे आणि समर्पणाने कराल. भविष्यात तुम्हाला फायदा होईल. वरिष्ठ अधिकारी तुमची आज प्रशंसा करताना दिसतील. मित्रांसोबत धार्मिक स्थळी जाल.
धनु
आज व्यवसायातील कामे पूर्ण होताना दिसतील. शत्रू बलाढ्य होतील. मित्रांच्या मदतीने काम पूर्ण होईल. नोकरीच्या ठिकाणी यश मिळेल. मित्रांकडून आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. शुभ कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळेल. व्यवसायाच्या संदर्भात प्रवास करावा लागेल
मकर
आज उच्च अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने कामाच्या ठिकाणी मान-सन्मान मिळू शकेल. मालमत्तेशी संबंधित कोणतेही प्रकरण चालू असेल तर अधिकाऱ्याच्या मदतीने सोडवाल. खाण्यापिण्याच्या सवयींवर नियंत्रण ठेवा अन्यथा प्रकृती बिघडेल. सामाजिक कार्यात रुची वाढेल.
कुंभ
आजच्या व्यवसायात देवी लक्ष्मीची कृपा असू शकते. ज्यामुळे आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थिती मजबूत होईल. कुटुंबात अनेक दिवसांपासून सुरु असलेला वाद संपेल. पैसे गुंतवण्याचा विचार करत असाल तर दिवस चांगला असेल. मित्रांना भेटून तुम्हाला आनंद भेटेल. जोडीदारासोबत फिरायला जाल.
मीन
आज तुम्हाला लाभाचे संकेत मिळतील. ज्यामुळे सभोवतालचे वातावरण आनंदी राहिल. व्यवसायात जास्त पैसे गुंतवण्याचा विचार करत असाल तर भविष्यात फायदा होईल. कुटुंबाती महत्त्वाचे निर्णय घेतल्याने फायदा होईल. वडील तुमच्यावर प्रेम करतील.