जळगाव मिरर / ३ मार्च २०२३
जळगांव जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गायझेशन जितो लेडीज विंग तर्फे अहिंसा रन रविवार दि. २ एप्रिल २०२३ रोजी ३ / ५ / १० किलोमीटर अंतर मॅरेथॉन आयोजित करण्यात आली आहे. अहिंसा रन ६५ शहरात एकाच दिवशी एकाच वेळी घेण्यात येणार असून शांती व अहिंसेचा प्रचार आणि प्रसार करण्याच्या अनुषंगाने आज दि. ३ मार्च २०२३ रोजी अहिंसा रन चे अनावरण करण्यात आले.
अहिंसा रन जळगांव जितो चे अनावरण हे पोलीस अधिक्षक श्री. एम जयकुमार, संदीप गवित, माजी मंत्री श्री.सुरेशदादा जैन, जैन उद्योग समुहाचे श्री. अशोकभाऊ जैन, व मुख्य प्रायोजक श्री. प्रीतम रायसोनी, श्री.अजय ललवाणी, श्री.रजनीकांतभाई कोठारी, श्री. राजेश चोरडिया, श्री. डॉ.परेश दोशी, विराज कावडीया, इत्यादींच्या हस्ते करण्यात आले.
जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गायझेशन जितो लेडीज विंग तर्फे आयोजित अहिंसा रन यात सर्वांनी सहभागी होऊन अहिंसेचा प्रसार करावा असे प्रास्तविक जितो लेडीज विंग अध्यक्ष सौ. निता जैन यांनी केले. जितो लेडीज विंग द्वारा आयोजित अहिंसा रन जळगांव अनावरण चे सूत्रसंचालन सौ. सुलेखा लुंकड यांनी केले व कार्यक्रमात जितो जळगांव चे अध्यक्ष श्री. प्रवीण पागरिया, सचिव श्री. प्रवीण छाजेड, जितो युथ विंग अध्यक्ष श्री. हरक सोनी, सचिव नीरज सेठिया, जळगांव रनर चे अध्यक्ष श्री. किरण बच्छावं, श्री. विक्रांत सराफ व कार्कर्त्यांसमवेत कुशल गांधी, अपना राका, गुंजन कांकरिया, विराज कावडीया, संध्या कांकरिया, उषा जैन, अनिमेश संचेती, चेतन जैन, प्रियांशू सुराणा ई. उपस्थित होते. अहिंसा रन चे ऑनलाईन रजिस्ट्रेशन सुरू झाले आहे व त्याच्यासाठी ऑनलाईन लिंक व क्यू आर कोड हे खाली दिले आहे आणि ऑफलाईन फॉर्म हे वसंत सुपर शॉप, नवजीवन सुपर शॉप, रायसोनी किड्स शॉपी व लपिनोज पिझ्झा ई. ठिकाणी उपलब्ध आहे.