जळगाव मिरर | २६ जुलै २०२४
वाळू वाहतुकीचे दोन गुन्हे दाखल असतानाही वाळू वाहतुकीसाठी २ लाख ६० हजारांची लाचेची मागणी करण्यात आली. मात्र तडजोडीनंतर पन्नास हजार रुपयाची रक्कम स्वीकारताना भडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदाराला जळगावच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवार (दि.२६) रोजी भडगाव पोलीस स्टेशनच्या आवारात रंगेहाथ अटक करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, किरण रविंद्र पाटील (वय 41, व्यवसाय नोकरी, पोलिस हवालदार भडगाव पोलिस स्टेशन) असे आरोपी हवालदाराचे नाव आहे. भडगाव येथील तक्रारदार रहिवाशी आहे. त्यांना भडगाव पोलीस स्टेशन येथे कार्यरत किरण रवींद्र पाटील यांनी गुरुवार (दि.२५) रोजी तक्रारदाराकडे वाळू वाहतूक करण्यासाठी तसेच त्यांच्यावर कोणतीही कारवाई न करण्यासाठी हवालदार किरण पाटील याने तक्रारदार 2 लाख 60 हजार रुपये लाचेची मागणी केली.
याबाबत तक्रारदार लाच प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. तक्रारीची गुरुवार (दि.२५) रोजी किरण पाटील यांनी तक्रारदार यांचेकडे 2 लाख 60 हजार रुपयेची मागणी केली. यातील पहिला हफ्ता म्हणून तडजोडीअंती 50,000 रुपये लाच रक्कम घेताना लाचलुचपत विभागाचे पोलीस उप अधिक्षक सुहास देशमुख ,पोलिस निरीक्षक नेत्रा जाधव, पोलीस उप निरीक्षक दिनेशसिंग पाटील, पोलीस कॉन्सटेबल राकेश दुसाने, पोलीस कॉन्सटेबल अमोल सुर्यवंशी यांच्या पथकाने रंगेहाथ पकडण्यात आले. याबाबत भडगांव पोलीस स्टेशन येथे संशयिताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.