जळगाव मिरर | ३ ऑक्टोबर २०२३
राज्यातील अनेक बेरोजगार तरुणासाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. ज्या तरुणांना नोकरी करण्याचे स्वप्न असतील त्यांच्यासाठी एक सुवर्ण संधी मिळू शकते. दूरसंचार विभागात ‘AAO, सीनियर अकाउंटंट, MTS, LDC, पीएस स्टेनो, स्टेनो’ या पदांच्या एकूण ३९ रिक्त जागा भरण्यासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. तसेच उमेदवारांना त्यांचे अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहेत. दूरसंचार विभाग पुणे भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख, आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा या बाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊ या.
दूरसंचार विभाग भरती २०२३ –
पदाचे नाव – AAO, सीनियर अकाउंटंट, ज्युनियर अकाउंटंट, LDC, पीएस स्टेनो, MTS
एकूण पद संख्या – ३९
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार असून याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी (https://drive.google.com/file/d/17krwnmrk0pMLs0nCtAbLb_MbMceoEXrI/view) या लिंकवरील जाहिरात वाचा.
वयोमर्यादा – ५६ वर्षांपेक्षा कमी
अर्जाची पद्धत – ऑफलाईन.
अर्ज पाठविण्याचा पत्ता –
द जॉइंट कंट्रोलर ऑफ कम्युनिकेशन अकाउंट्स, ओ/ओ कंट्रोलर ऑफ कम्युनिकेशन अकाउंट्स. महाराष्ट्र आणि गोवा. बीएसएनएल प्रशासकीय इमारत, तिसरा मजला, जुहू रोड. सांताक्रूझ पश्चिम. मुंबई- ४०००५४
अर्ज करण्याची शेवटची तारीख- ३१ ऑक्टोबर २०२३
अधिकृत वेबसाईट – dot.gov.in
भरती संबंधित अधिकच्या आणि सविस्तर माहितीसाठी तसेच शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी (https://drive.google.com/file/d/17krwnmrk0pMLs0nCtAbLb_MbMceoEXrI/view) या लिंकवरील जाहिरात अवश्य पाहा.