जळगाव मिरर | ९ सप्टेंबर २०२४
शहरातील गणेश कॉलनी परिसरातील ‘गणेश कॉलनीचा राजा’ मित्र मंडळातर्फे यंदा भव्य बाप्पांची प्रतिष्ठापना करण्यात आली. यावेळी जळगाव उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित यांच्याहस्ते महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित यांचा सत्कार सूर्या राहुल सोनवणे यांच्याहस्ते करण्यात आला. यावेळी इंजी.राहुल सोनवणे, भूषण भोळे, शंभू भोसले, कल्पेश कासार, आकाश पारधे, धीरज हिवराळे यांच्यासह परिसरातील नागरिक व गणेशभक्त मोठ्या संख्येने उपस्थिती होते.