• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home राज्य

शेतकरी कर्जमाफीतील अडचणी सोडवण्यासाठी जिल्हानिहाय हेल्पलाइन सुरू करा; प्रमोद पाटलांची मागणी !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
June 25, 2026
in राज्य, ब्रेकिंग, राजकीय, सामाजिक
0
शेतकरी कर्जमाफीतील अडचणी सोडवण्यासाठी जिल्हानिहाय हेल्पलाइन सुरू करा; प्रमोद पाटलांची मागणी !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २५ जून २०२६ 

महाराष्ट्र राज्यातील महायुती सरकारने नुकतीच शेतकरी बांधवांसाठी ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना’ जाहीर केली आहे. मात्र, या योजनेच्या अंमलबजावणीदरम्यान अनेक तांत्रिक अडचणी, नियम व अटींमुळे शेतकरी मोठ्या संभ्रमात सापडले असून त्यांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर शेतकरी कर्जमाफी योजनेशी संबंधित सर्व प्रश्नांचे तातडीने निराकरण करण्यासाठी राज्य सरकारने जिल्हानिहाय हेल्पलाइन सुरू करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते प्रमोद पाटील यांनी केली आहे.

प्रमोद पाटील यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कर्जमाफी योजनेचा लाभ घेण्यासाठी अनेक शेतकऱ्यांना पात्रता, कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, तांत्रिक त्रुटी तसेच विविध नियमांबाबत स्पष्ट माहिती मिळत नाही. त्यामुळे अनेक शेतकरी सरकारी कार्यालयांचे उंबरठे झिजवत असून त्यांच्यामध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे.

विशेषतः कर्जधारक शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या वारसांना कर्जमाफीचा लाभ मिळविण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. वारस नोंदणी, आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया आणि इतर प्रशासकीय बाबींमुळे अनेक प्रकरणे प्रलंबित राहत आहेत. अशा सर्व प्रश्नांचे प्रभावी मार्गदर्शन एकाच ठिकाणी उपलब्ध व्हावे, यासाठी प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्र हेल्पलाइन सुरू करण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.

याशिवाय कर्जमाफी योजनेशी संबंधित तक्रारी, शंका, तांत्रिक अडचणी आणि अर्ज प्रक्रियेतील त्रुटी दूर करण्यासाठी जिल्हास्तरावर समर्पित अधिकारी नियुक्त करावेत. हेल्पलाइनद्वारे शेतकऱ्यांना त्वरित मार्गदर्शन मिळाल्यास योजनेची अंमलबजावणी अधिक पारदर्शक व प्रभावी होईल आणि पात्र लाभार्थ्यांना वेळेत कर्जमाफीचा लाभ मिळण्यास मदत होईल, असेही प्रमोद पाटील यांनी म्हटले आहे. राज्य सरकारने शेतकरी हिताचा विचार करून जिल्हानिहाय हेल्पलाइन कार्यान्वित करावी आणि कर्जमाफी प्रक्रियेत येणाऱ्या सर्व अडचणी तातडीने दूर करून शेतकरी बांधवांना दिलासा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

Related Posts

शेतकरी कर्जमाफी पुन्हा लांबणीवर? आयकर विभागाच्या डेटाअभावी अंमलबजावणीला ब्रेक !
जळगाव

शेतकरी कर्जमाफी पुन्हा लांबणीवर? आयकर विभागाच्या डेटाअभावी अंमलबजावणीला ब्रेक !

July 10, 2026
अभाविप स्थापना दिन व राष्ट्रीय विद्यार्थी दिनानिमित्त ११०० शुभेच्छा कार्डांचे वितरण !
जळगाव ग्रामीण

अभाविप स्थापना दिन व राष्ट्रीय विद्यार्थी दिनानिमित्त ११०० शुभेच्छा कार्डांचे वितरण !

July 10, 2026
गुरुपौर्णिमा महोत्सवासाठी पूज्य किरीट भाईजी जळगावात येणार !
जळगाव

गुरुपौर्णिमा महोत्सवासाठी पूज्य किरीट भाईजी जळगावात येणार !

July 10, 2026
भारतीय सैन्यात अधिकारी व्हायचंय? जळगावात मिळणार तज्ज्ञांचे ४ तासांचे मोफत मार्गदर्शन
राज्य

भारतीय सैन्यात अधिकारी व्हायचंय? जळगावात मिळणार तज्ज्ञांचे ४ तासांचे मोफत मार्गदर्शन

July 10, 2026
अमळनेर सार्वजनिक बांधकाम विभागातील गैरव्यवहाराची महिनाभरात चौकशी; दोषींवर कठोर कारवाईचा मंत्र्यांचा इशारा !
जळगाव

अमळनेर सार्वजनिक बांधकाम विभागातील गैरव्यवहाराची महिनाभरात चौकशी; दोषींवर कठोर कारवाईचा मंत्र्यांचा इशारा !

July 10, 2026
राष्ट्रीय कबड्डी पंचपदी जळगावचा झेंडा; विनय चौधरी व रितेश तायडे यांना राष्ट्रीय मान्यता
जळगाव

राष्ट्रीय कबड्डी पंचपदी जळगावचा झेंडा; विनय चौधरी व रितेश तायडे यांना राष्ट्रीय मान्यता

July 10, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
तुमच्या टीव्हीचा डिस्प्ले गेला? महागड्या बदलाऐवजी आता कमी खर्चात रिपेअरची सुविधा जळगावात ; मोफत पिकअप-ड्रॉप !

तुमच्या टीव्हीचा डिस्प्ले गेला? महागड्या बदलाऐवजी आता कमी खर्चात रिपेअरची सुविधा जळगावात ; मोफत पिकअप-ड्रॉप !

July 10, 2026
शेतकरी कर्जमाफी पुन्हा लांबणीवर? आयकर विभागाच्या डेटाअभावी अंमलबजावणीला ब्रेक !

शेतकरी कर्जमाफी पुन्हा लांबणीवर? आयकर विभागाच्या डेटाअभावी अंमलबजावणीला ब्रेक !

July 10, 2026
अभाविप स्थापना दिन व राष्ट्रीय विद्यार्थी दिनानिमित्त ११०० शुभेच्छा कार्डांचे वितरण !

अभाविप स्थापना दिन व राष्ट्रीय विद्यार्थी दिनानिमित्त ११०० शुभेच्छा कार्डांचे वितरण !

July 10, 2026
चाळीसगावात गुटखा तस्करांवर पोलिसांचा मोठा प्रहार; पाच जण जेरबंद, साडेसहा लाखांचा मुद्देमाल जप्त

चाळीसगावात गुटखा तस्करांवर पोलिसांचा मोठा प्रहार; पाच जण जेरबंद, साडेसहा लाखांचा मुद्देमाल जप्त

July 10, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group