जळगाव मिरर | १७ जुलै २०२४
दीड महिन्यापूर्वी नाशिक येथून दुचाकी चोरून जळगावात फिरवणाऱ्या कुणाल ललित तिवारी (१९, रा. लक्ष्मण भाऊ नगर, जळगाव) याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी (१६ जुलै) पहाटे अटक केली. त्याच्याकडून चोरीची दुचाकी हस्तगत करत त्याला नाशिक पोलिसांच्या ताब्यात दिले.
मिळालेल्या माहितीनुसार, जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी चोरीच्या दुचाकींचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. हा शोध सुरू असताना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बबन आव्हाड यांनी जितेंद्र पाटील, नितीन बाविस्कर, बबन पाटील, भारत पाटील यांचे पथक तयार केले. त्यात नाशिक येथून जळगावातील एकाने दुचाकी (क्र. एमएच १५, एचके २९६५) चोरल्याची माहिती मिळाल्यावरून पथकाने मंगळवारी पहाटे पेट्रोलिंग दरम्यान कुणाल तिवारी याला ताब्यात घेतले. त्याकडून दुचाकी हस्तगत करीत त्याला नाशिक पोलिसांच्या ताब्यात दिले.