जळगाव मिरर / ९ फेब्रुवारी २०२३
श्री सिद्धिविनायक वेंकटेश देवस्थान जळगावच्यावतीने पाळधी येथे गणपती बाप्पाची ३१ फुटी उंच भव्य मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना करण्यात येत आहे. या सोहळ्याच्या तिसऱ्या दिवशी म्हणजे ९ फेब्रुवारी रोजी गणपती बाप्पावर दोन लाख मोदकांचा महाअभिषेक करण्यात आला.
मंगळवार दि.७ फेब्रुवारी ते २२ फेब्रुवारी दरम्यान हा प्रतिष्ठापनेचा धार्मिक सोहळा पार पडणार आहे. तब्बल सोळा दिवस चालणाऱ्या या प्रतिष्ठापनेच्या सोहळ्यात नऊ अग्निकुंड धगधगत असणार असून दोन लाख ५१ हजार आहुती अर्पण करण्यात येणार आहे. याचबरोबर सोळा ही दिवस भक्तांना प्रसादाचा लाभ घेता येणार आहे. प्रतिष्ठापनेच्या तिसऱ्या दिवशी दि.९ फेब्रुवारी रोजी हवन करण्यात आले. यांच बरोबर कंकण बंधन, अन्नाधिवास, जलाधिवास करण्यात आला. सोबतच सहस्र मोदक अर्चना, सहस्र मोदक हवन, अथर्वशीर्ष पाठ करण्यात आला. श्री सिद्धिविनायक महागणपती प्राणप्रतिष्ठा समारंभ हा तमाम गणेश भक्तांसाठी एक उत्सव आहे. या ठिकाणी भाविक मोठ्या प्रमाणावर येत असून अधिक भाविकांनी या ठिकाणी गणपती बाप्पाच्या सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री सिद्धी वेंकटेश देवस्थानतर्फे करण्यात आले आहे.
