जळगाव मिरर । १ फेब्रुवारी २०२३।
जळगाव येथील सामाजिक कार्यकर्त्या, नारीशक्ती बहुद्देशीय संस्था जळगाव अध्यक्षा तसेच जायंटस गृप ऑफ तेजस्विनी जळगाव अध्यक्षा सौ.मनिषा किशोर पाटील यांना राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
जामनेर येथील वसुनंदिनी फाऊंडेशन यांच्यातर्फे दि.२९ जानेवारी रोजी हा पुरस्कार वितरण सोहळा ब्राह्मण सभा हॉल जळगाव येथे आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्याला चित्रपट निर्मिती प्रमुख पुणे मा.प्रिया दामले, भारतीय साहित्य व सांस्कृतिक मंच संस्थापक श्री.विशाल सिरसट, प्रख्यात आरोग्य तज्ञ डॉ.विठ्ठल आहेर, कलाभ्रमंती संस्थेच्या सौ.नयना ओगले, एनवाय हेल्थकेअर च्या डॉ.मनिषा गांगुर्डे, कोर्ट कमिशनर ॲड.अश्विनी डोलारे, ज्येष्ठ समाजसेविका प्रज्ञा कांबळे, लेखिका गायिका अभिनेत्री वर्षा देशमुख शितोळे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मनिषा पाटील यांच्या सामाजिक व महिलांविषयक कार्याची दखल घेऊन त्यांना स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्काराने गौरविण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन व संकल्पना वसुनंदिनी फाऊंडेशन जामनेर या संस्थेच्या संचालिका सौ.माधुरी कुलकर्णी व श्री.विद्याधर सोनवणे यांच्या वतीने करण्यात आले होते.