जळगाव मिरर / १९ जानेवारी २०२३
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज मुंबईच्या दौऱ्यावर आहेत. आजच्या दौऱ्यात पंतप्रधान मोदींनी शहरातील कोट्यावधीच्या विकासकामांची पायाभरणी केली. यादरम्यान मोदींची मुंबईतील बीकेसी मैदानावर सभा देखील झाली. या सभेत संबोधित करताना पंतप्रधान मोदींनी मागील महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला आहे.
मुंबईत विकासकामांच्या शुभारंभानंतर पंतप्रधान मोदी म्हणाले की, भाजप, एनडीएचं सरकार कधीही विकासाच्या आड येत नाही. राजकीय स्वार्थासाठी भाजप आणि एनडीए सरकार कधीही कुठल्या विकासाच्या आड येत नाही. पण मुंबईत वेळ वेळी असं होताना पाहीलं आहे.
पुढे बोलताना पीएम मोदी म्हणाले की स्वनिधी योजना याचं एक उदाहरण आहे. शहरातील अर्थव्यवस्थेचा भाग असलेले रेडीवाले आणि छोटे दुकानदार त्यांच्यासाठी योजना सुरु केली. या छोट्या व्यापाऱ्यांसाठी बँकाकडून स्वस्त आणि विना गॅरंटी कर्ज देण्यात आलं. ३५ लाखा व्यापाऱ्यांना याचा फायदा झाला आहे. हे काम खूप आधी व्हायला पाहिजे होतं. मुंबई महापालिका निवडणूक प्रचाराचे रणशिंग फुंकत दिल्ली-महाराष्ट्र-मुंबई भाजपची सत्ता असायाल हवी असं सूचक विधान पंतप्रधान मोदी यांनी केलं. मोदी म्हणाले की, महाराष्ट्रात डबल इंजिनचं (शिंदे-फडणवीस) सरकार नसल्याने प्रत्येक कामात अडचणी आणल्या गेल्या, ज्याचा फटका जनतेला बसला. असं पुन्हा होऊ नये म्हणून दिल्ली पासून महाराष्ट्र, मुंबई पर्यंत सर्वांचा हातभार चांगला समन्वय असलेली व्यवस्था निर्माण केली पाहीजे असे पंतप्रधान मोदी म्हणाले. मुंबईच्या विकासासाठी शहरात समर्पित प्रशासन असेल तर विकास वेगानं होतो, एकत्रित मिळून मुंबईचा विकास करु, असे मोदी म्हणाले.