जळगाव मिरर / ५ मार्च २०२३
जिल्ह्यात महिला दिनाची लगबग आजपासून दि ५ मार्च पासून सुरु झालेली आहे. यात अनेक सामाजिक संस्था महिलांचा सत्काराचे आयोजनासह अनेक सामाजिक कार्यक्रमाची सुरुवात झाली असून आज नारीशक्ती नारीशक्ती बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने जळगावात कर्तृत्ववान महिला भगिनींचा सन्मान आज करण्यात आला.
जागतिक महिला दिनानिमित्त आपल्या जळगाव नारीशक्ती बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने शहरातील पहिली बेटी धनाची पेटी असे समजुन पहिल्या कन्यारत्नाचे स्वागत करून समाज हिताचे कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान महिला भगिनींचा सत्कार समारंभ लायन्स हॉल येथे करण्यात आला आहे. याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राध्यापक डॉ शमा सराफ तर प्रमुख अतिथी महापौर जयश्री महाजन, माजी महापौर सीमा भोळे, महिला पोलीस दक्षता सायबर क्राईम स्वाती पाटील, स्त्री रोगतज्ञ डॉ.सोनल इंगळे, ह.भप मोरदे महाराज, अध्यक्ष मनीषा पाटील उपस्थित होते.
स्त्रीरोगतज्ञ डॉ सोनल इंगळे या महिलांना मुलगी वाचवा तिच्यासाठी असणाऱ्या योजना या विषयी व अध्यक्ष स्थानी असलेल्या डॉ शमा सराफ ह्या मुलगी गर्भात तर वाचवायची पणं पुढे ती सुदृढ व सुशिक्षित सुरक्षित व्हावी तसेच एका आईचे एका शिक्षकांना लिहिलेले पत्र त्यांनी वाचून दाखवले व त्यातून आईने शिक्षिकेला मुलीचे व्यक्तिमत्व घडवण्यासाठी केलेली विनंती व कळकळ व्यक्त केली व महिलांना मार्गदर्शन केले तसेच स्वाती पाटील ह्या सायबर सेल यावर महिलांची फसवणूक व त्याबद्दल बाळगावा याची सावधगिरी यावर मार्गदर्शन केले.
प्रमुख अतिथी म.न.पा महापौर जयश्री महाजन यांनी ८ मार्च आंतरराष्ट्रीय महिला दिन का साजरा करावा तसेच महिलांचा समानतेचा हक्क यावर मार्गदर्शन केले. यामध्ये कन्यारत्नावर समाधान मानणाऱ्या खालील महिलांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. मीनल देवरे,राही गावंडे,भाग्यश्री कुलकर्णी ,श्रीमती चंद्रकलाबाई पाटील,अलका कुलकर्णी, लीना पवार , हेतल सुरतवाला , मीनाक्षी बेंडाळे ,निशा महाजन, शालिनी शिंदे ,माधवी देशपांडे,शुभदा पाटील ,वेदा बेंडाळे,विद्या चौधरी दिपाली कोल्हे ,प्रीती व्यास ,सपना श्रीवास्तव यांना प्रमाणपत्र व ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी संस्थेच्या मनीषा पाटील ,ज्योती राणे , ॲड सीमा जाधव,नूतन तासखेडकर, माधुरी शिंपी, संगीता चौधरी, किमया पाटील भारती कापडणे ,रेणुका हिंगु,निता वानखेडकर ह्या उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती ज्योती राणे यांनी तर आभार ॲड. सीमा जाधव यांनी मानले.
