जळगाव मिरर / ३१ मार्च २०२३ ।
राज्यात शिंदेंच्या शिवसेनेसह भाजपची सत्ता आहे. तर दुसरीकडे ठाकरे व शिंदेंच्या नेत्यामध्ये असा एकही संधी दोन्ही गटातील नेते सोडत नाही एकमेकावर टीका करण्यासाठी राज्यातील विरोधी पक्ष असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगलीत एक भाकीत केल्याने त्याची चर्चा आता राज्यभर सुरु झाली आहे.
काय म्हणाले जयंत पाटील?
जयंत पाटील यांनी यापू्र्वीही महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागणार असल्याचे वक्तव्य केले होते. त्याचा पुनरुच्चार त्यांनी केला आहे. पाटील म्हणाले की, जर सुप्रीम कोर्टाचा निकाल लागला. त्यात बंडखोर आमदारांवर अपात्रतेची कारवाई झाली, तर हे आमदार उद्धव ठाकरे यांच्याकडे जातील. त्यामुळे महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावण्याशिवाय कोणताही पर्याय असणार नाही, असा दावा त्यांनी केला. आता जयंत पाटील यांच्याकडे राष्ट्रपती राजवटीबाबत नेमकी काय माहिती आहे, ते विचारणार असल्याचे अजित पवार यांनी म्हटले आहे.
काय म्हणाले पवार?
अजित पवार म्हणाले की, मला महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागेल, अशी परिस्थिती सध्या तरी दिसत नाही. परंतु जयंत पाटील यांचे स्टेटमेंट मी पाहिलेले आहे. जयंतरावांची आणि माझी दोन तारखेलाच भेट होईल. त्यावेळेस मी त्यांना विचारने की बाबा, काय आपल्याकडे क्लू मिळालेला आहे. काय आपल्याकडे माहिती मिळालेली आहे. ज्या माहितीच्या आधारे आपण असे वक्तव्य केलेले आहे. ते समजून घेण्याचा प्रयत्न आमच्या पक्षाचे प्रांताधिकारी आणि आमचे सहकारी यांच्याकडून करेन.
महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षातील याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे या दोन्ही गटाचे युक्तिवाद पूर्ण झाले आहेत. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने अजूनही या प्रकरणी निकाल दिला नाही. आता ते काय निकाल देणार, याकडे उभ्या देशाचे डोळे लागले आहेत. कारण त्यामुळे आगामी राजकारणाची दिशाही ठरणार आहे. या निकालानंतर महाराष्ट्रात खरेच राष्ट्रपती राजवट लागेल का, हे समोर येणार आहे.
