जळगाव मिरर / २० फेब्रुवारी २०२३ ।
येथील अरुणोदय ज्ञान प्रसारक मंडळ संचलित कला, वाणिज्य व गृहविज्ञान महिला महाविदयालयातीक शिक्षकेतर कर्मचा-यांनी राज्यव्यापी काम बंद आंदोलनात आपला सहभाग नोंदवला. महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठ व अनुदानित महाविदयाल – यांच्या कर्मचा-यांनी त्यांच्या रास्त व न्याय्य मागण्या पूर्ण व्हाव्यात यासाठी आज काम बंद आंदोलन पाळण्याचा -निर्णय घेतला त्याला प्रतिसाद देत महिला महाविदयालयातील शिक्षकेतर कर्मचा-यांनी आज संपावर जात आपली सहभाग नोंदवला.
“सातव्या वेतन आयोगातील तरतुदी लागू करून वेतनाच्या फरकाची थकबाकी अदा करणे, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची रिक्त असलेली पदे भरण्यास मान्यता देणे, 2005 नंतर लागलेल्या कर्मचा-यांना जुनी पेन्शन योजना लागू करणे या व अशा महत्वपूर्ण मागण्या शासनाने स्वीकारून त्यांची त्वरित अंमल बजावणी करावी यासाठी हा आजचा एकदिवसीय काआणिक संप आयोजित करण्यात आल्याचे कर्मचारी संघटनेच्या पदाधिका-यांनी म्हटले आहे. यावेळी अध्यक्ष महेद्र चौधरी, कोषाध्यक्ष जीतेद्र पाटील, सचिव गणेश चौधरी यांच्यासह आदी सहकारी सहभागी झाले आहेत.
