जळगाव मिरर / ३१ मार्च २०२३ ।
शहरातील जुना व नवीन कानळदा रोड ज्या ठिकाणी एकत्र येतो त्या थांब्याला या परिसरातील महिलांना मारुती चौक असे नामकरण देवून राम नवमीला या फलकाचे अनावरण करण्यात आले.
सविस्तर वृत्त असे कि, शहरातून कानळदासह ग्रामीण भागाकडे जाणाऱ्या नवीन व जुना कानळदा रोड हा ज्या ठिकाणी एकत्रित येतो ज्याला आजपर्यत १०० फुटी चौक असे म्हणत असत त्याचे नामकरण आराध्य दैवत प्रभू श्री राम नवमीच्या दिवशी करण्यात आले आहे. आजपासून या चौकाचे नामकरण मारुती चौक असे करण्यात आले आहे. दि ३० रोजी सांयकाळी हरी ओम नगर परिसरातील महिलांनी एकत्रित येत या चौकाचे नामकरण केले. या प्रसंगी प्रिया साळी, सरलाबाई तुळसकर, ज्योती सोनवणे, खुशबू सोनवणे, जीवन सोनवणे, मयूर सोनवणे, कनक सोनवणे, वैशाली साळी, हर्ष तुळसकर, योगेश खर्चने, ज्योती बाविस्कर, देविदास बाविस्कर, सोनल खर्चने, रेखाबाई तुळसकर, आयुष सोनवणे, रुपेश तुळसकर यांच्यासह परिसरातील नागरीक उपस्थित होते. या नामकारणासाठी विशेष सहकार्य योगेश साळी यांनी केले आहे.
