जळगाव मिरर | २६ नोव्हेबर २०२३
संत िशराेमणी नामदेव महाराज यांच्या ७५३ व्या जयंतीिनमित्त भागवत धर्म प्रसारक मंडळ व पालखी साेहळा पत्रकार संघ अ भा क्षत्रिय नामदेव महासंघ महाराष्ट्र यांच्या संयुक्त िवद्यमाने २३ नाेव्हेंबरपासून पंढरपूर ते घुमान भव्य रथ व सायकल यात्रेचे अायाेजन करण्यात अाले अाहे. सदर सायकल यात्रेचेे दिनांक २७ नाेव्हेंबर सोमवार राेजी सकाळी ८ वाजता जळगाव जिल्ह्यातील पहूर, पाळधी (ता.जामनेर) येथे आगमन होणार आहे.
तरी या रथ व सायकल यात्रेच्या स्वागता साठी मोठ्या संख्येने समाजबांध व वारकरी संप्रदाय पत्रकार संघ यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन अखिल भारतीय क्षत्रिय नामदेव महासंघाचे प्रदेशाध्यक्ष महेश जी ढवळे, राज्य संघटक मनोज भांडारकर, अ भा राष्ट्रीय अध्यक्ष वनेश भाऊ खैरनार,जळगाव जिल्हाध्यक्ष बंडू नाना शिंपी रथयात्रेचे आयोजक सूर्यकांत भिसे, मनोज मांढरे, राजेंद्र सोनवणे, विवेक जगताप ,मुकुंदराव मेटकर, पी टी शिंपी शरदराव बिरारी जिल्हा युवक अध्यक्ष तुषार शिंपी जितेंद्र शिंपी संजय ईसइ शेंदुर्णी डॉ.श्रीराम शिंपी पाळधी प्रभाकरराव शिंपी प्रमोद कापुरे रवींद्र लोहार बोदवड प्रा शरद काठोके जामनेर, SR टेलर्स यानी या भव्य रथयात्रेचे स्वागता साठी शिंपी समाज बांधव व जळगाव जिल्ह्यातील वारकरी संप्रदाय, सायकल प्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने या भव्यरथ यात्रेचे स्वागतासाठी पहुर व पाळधी येथे उपस्थित राहण्याचे आवाहन केलेले आहे