जळगाव मिरर | १८ जुलै २०२४
राज्यात प्रतिबंधित असलेल्या गुटख्याची अवैध वाहतूक करणारे वाहनावर पोलिसांनी कारवाई केली. त्यांच्याकडून वाहनासह सुमारे ३ लाख १३ हजारांचा गुटखा जप्त केला. याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बऱ्हाणपूर कडून टाटा मॅजीक क्रमांक (एमपी- ६८, टी-०२२७) या वाहनातून गुटखा घेऊन येत असल्याची माहिती रावेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी पोहेकॉ सचिन घुगे, प्रमोद पाटील, समाधान ठाकुर, विशाल पाटील, संभाजी बिजागरे यांना कारवाईच्या सूचना दिल्या.
या पथकाने येथील रुची मोटर्स जवह गुटखा वाहतुक करणाऱ्या वाहनाची तपासणी केली. यामध्ये त्यांना ७ गोण्यांमध्ये १ लाख १२ हजार ८०० रुपयांचा पान मसाला व तंबाखुयुक्त गुटखा मिळून आला. पोलीसांनी २ लाख रुपये कीमतीची टाटा मॅझीक गाडी असे ३ लाख १२ हजार ८०० रुपयांचा ऐवज जप्त केला गुटखा राज्यात प्रतिबंधित असतांना गुटख्याची अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनचालक नदिमखान ईस्माईलखान (वय ३५, रा. कोतवाल वाडा रावेर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे.