जळगाव मिरर / २८ फेब्रुवारी २०२३
कास्ट्राईब कर्मचारी महासंघ महाराष्ट्र राज्य अध्यक्ष कृष्णा इंगळे नागपूर यांचेकडील आदेश क्र. कास्ट्राईब / महासंघ / १३० /- २०२३ दिनांक १७.२.२०२३चे आदेशान्वये कास्ट्राईब कर्मचारी महासंघ महाराष्ट्र राज्य यासंघटनेच्या घटनेतील तरतुदी नुसार व अध्यक्षाना दिलेल्या अधिकाराचा वापर करुन श्री. पुलकेशी पांडूरंग केदार ग्रामविकास अधिकारी यांची कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यपदी दोन वर्षासाठी निवड करणेत आली आहे, जळगांव जिल्हयातील यापुर्वीची सर्व कार्यकारीणी बरखास्त करणेत येऊन श्री.पुलकेशी केदार जिल्हाध्यक्ष यांना नवीन कार्यकरणीसाठी नियुक्तीचे अधिकार देण्यात आले आहे.
श्री. पुलकेशी पांडूरंग केदार यांची कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्षपदी पदी नेमणुक झाल्याबद्यल कास्ट्राईब, कर्मचारी शिक्षक संघटनेचे अति. राज्य सरचिटणीस प्रभाकर पारवे, नाशिक विभागीय अध्यक्ष रविंद्र तायडे, राजेद्र राणे, साधना बाविस्कर, बापु साळुंके, जिल्हाध्यक्ष कास्ट्राईब शिक्षक (प्राथमीक संघटना) संजय निकम, जिल्हाध्यक्ष कास्ट्राईब शिक्षक (माध्यमीक.) बी. एस. पाटील कास्ट्राईब भुमी अभिलेख संघटना, महसुल विभागाचे योगेश अडकमोल, विलास डोंगरे, महेश सपकाळे, राहुल सोनवणे नायब तहसीलदार, कास्ट्राईब महासंघाचे ब्रम्हानंद तायडे, महानगरपालीकेचे सुरेश भालेराव, नंदु गायकवाड, कास्ट्राईब वन कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विकास सोनवणे, आनंद तेली, योगेश सोनवणे, कोषागार कार्यालयाचे श्री. आनंदकुमार मानकर, राजु कुमावत, रविंद्र गायकवाड, प्रा. प्रमोद लोंढे प्रा. रविंद्र कोल्हेकर, प्रा. नितीन इंगळे, कृषी विभागाचे किशोर मैहिराळे, मिलींद वाल्हे, सौ. माया तायडे, शशीकांत सुरवाडे, जितेंद्र कोळी, राजेंद्र सोनवणे जि. प. कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे नितीण सोनवणे, किशोर सांळुके, राजु वानखेडे, इ. संघटनेच्या पदाधिका-यांनी श्री. केदार यांचे कास्ट्राईब महासंघाचे जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्यल सर्वच स्थरातुन स्वागत अभिनंदण करणेत येत आहे.