जळगाव मिरर / ४ मार्च २०२३ ।
देशभरात ७ मार्च रोजी होळीचा सण साजरा होणार आहे. जिल्ह्यातही मोठ्या उत्साहात होळीच्या सणासह दुसऱ्या दिवशी रंगोत्सव हि होत आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही धुलीवंदनानिमित्त मंगळवार दिनांक ७ मार्च २०२३ रोजी युवाशक्ती फाऊंडेशनतर्फे काव्यरत्नावली चौक जळगाव येथे रंग बरसे हा रंगोत्सवाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. सदर कार्यक्रम जळगावकर नागरिकांसाठी असून याठिकाणी महिला व बालगोपालांसाठी विशेष व्यवस्था करण्यात येणार आहे.
हायटेक साऊंड सिस्टीम, डी.जे., पारंपारिक वाद्य, उदयपूर येथील सुप्रसिद्ध 1500 किलो नैसर्गिक रंग, ढोलपथक, पारंपारिक नृत्य, होळी गीते इत्यादींची व्यवस्था करण्यात आली आहे. सकाळी 9.30 ते दुपारी 12.30 वाजेदरम्यान सदर कार्यक्रम जळगावकर नागरिकांसाठी खुले राहणार आहे. कोविड नंतर प्रथमच धुलीवंदनाचा सण मोठ्या प्रमाणात व निर्बंधमुक्त साजरा होत आहे. तरी जास्तीतजास्त जळगावकर नागरिकांनी सहकुटुंब या आयोजनात सहभागी होऊन आनंद द्विगुणीत करावा असे आवाहन युवाशक्ती फाऊंडेशनचे संस्थापक विराज कावडीया व सचिव अमित जगताप यांनी केले आहे.
