जळगाव मिरर | १७ जानेवारी २०२४
अवैध वाळू वाहतुक रोखण्यासाठी गेलेल्या पथकातील मंडळ न अधिकाऱ्यांच्या अंगावर डंपर घेवून जात त्यांना जीवेठार न मारायाचा प्रयत्न केला होता. याप्रकरणी डंपर चालकासह मालक दोन्ही फरार होते. एलसीबीच्या पथकाने डंपर चालक पुंडलिक उर्फ तेजस ज्ञानेश्वर सोनवणे (वय २३, रा. नांद्रा खुर्द) व मालक सुभाष पंडीत कोळी या दोघांना अटक केली आहे.
जिल्ह्यात अवैध वाळूची मोठ्या प्रमाणात वाहतुक होत आहे. वाळू वाहतुक करणाऱ्यांवर कारवाईसाठी वरणगाव मंडळ अधिकारी रजनी शंकर तायडे या गेल्या होत्या. त्यांनी रस्त्यावरुन भरधाव वेगाने जात असलेल्या (एमएच १९ न झेड ४६७९) क्रमांकाच्या डंपरला थांबण्यासाठी इशारा के ला. मात्र डंपर चालकाने वाहन न थांबवता त्याने मंडळ – अधिकाऱ्यांच्या अंगावर वाहन घेवून जात त्यांना जीवेठार मारण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर डंपर त्याठिकाणी सोडन तो 1 तेथून पळून गेला होता. याप्रकरणी वरणगाव पोलीस ठाण्यात र डंपर चालकासह मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. होता. या घटनेतील संशयितांना तात्काळ अटक करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक एम. राजकु मार, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांना दिले. त्यानुसार त्यांनी पथक तयार करीत रवाना केले.
डंपरचा चालक आणि मालक हे दोन्ही नांद्रा येथे असल्याची माहिती मिळताच पोलीस निरीक्षकांनी लागलीच पथकाला संशयितांना ताब्यात घेण्यासाठी रवाना केले. पथकाने चालक पुंडलिक उर्फ तेजस ज्ञानेश्वर पाटील व मालक सुभाष पंडीत कोळी या दोघांना ताब्यात घेतले. त्यांना वरणगाव पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि निलेश राजपूत, पोहेकॉ संदीप सावळे, किरण धनगर, नंदलाल पाटील, पोना भगवान पाटील, पोकॉ मोतीलाल चौधरी, ईश्वर पाटील यांच्या पथकाने केली.