अमळनेर : विक्की उत्तम जाधव
१४ वर्षीय अल्पवयीन मुलीला फुस लावून पळवून नेल्याचा प्रकार तालुक्यातील शहापूर येथे घडली असून याप्रकरणी मुलीच्या वडिलांनी मारवाड पोलिसांत तक्रार दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अमळनेर तालुक्यातील शहापूर येथील १४ वर्ष १ महिने वय असलेली अल्पवयीन मुलगी दिनांक १३ रोजी दुपारी बारा वाजेच्या सुमारास घरातून काही न सांगता निघून गेली. तिचा शोध सर्वत्र घेतला असता. मात्र ती मिळून न आल्याने अज्ञात इसमाने फुस लावून पळवून नेल्याची खात्री झाली. त्यामुळे मुलीच्या वडिलांनी मारवड पोलिसांत बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास हेकॉ सचिन निकम हे करीत आहेत.