अमळनेर : विक्की उत्तम जाधव
प्रताप कॉलेज मधिल जिमखाना तथा राज्यशास्त्र विभागाचा विद्यार्थ्यी-खेळाडू अमेय रविंद्र कोळी यांची निवड ही अखिल भारतीय विद्यापीठ क्रिकेट स्पर्धे साठी झाली आहे; कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ,जळ्गावचा संघाने प.विभागीय आंतर विद्यापीठीय क्रिकेट स्पर्धा ह्या १ ते १० फेब्रुवारी २०२३ रोजी शिकर,राजस्थान येथे संपन्न झाल्या.यात शिकर,राजस्थानने प्रथम क्रमांक मिळविला,सुरत,गुजरातने द्वितीय क्रमांक मिळविले तर तिसरा क्रमांक हा क.ब.चौ.उ.म.वि,जळ्गावने पटकाविले.या नंतर अखिल भारतीय विद्यापीठ क्रिकेट स्पर्धा या कुरुक्षेत्र,हरियाणा येथे २३ मार्च ते १ एप्रिल २०२३ रोजी स्पर्धा …
भव्य सामान्य ज्ञान स्पर्धा उत्साहात
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९३ वी जयंती निमित्ताने प्रताप कॉलेज मधिल सी.सी.एम.सी.विभाग व शिखर अकेडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १७.०२.२३ रोजी सकाळी ११ वाजता भव्य सामान्य ज्ञान परीक्षा घेण्यात आली.ही परीक्षा १०० गुणांची व वस्तुनिष्ट स्वरुपाची होती.
बक्षिसांची रक्कम:
१.प्रथम-११००
२.द्वितिय-९००
३.तृतीय-७००
४.उत्तेजनार्थ पहिले-५००
५.उत्तेजनार्थ दुसरे-५००
प्रस्तुत परीक्षेसाठी २५३ विद्यार्थ्यांनी आपल्या नावाची नोंद केली होती,या पैकी १९२ विद्यार्थी हे प्रत्यक्ष हजर होते.सदरच्या सामान्य ज्ञान परीक्षेसाठी संस्थेचे चिटणीस डॉ.ए.बी.जैन,प्र-प्राचार्य डॉ.एम.एस.वाघ,उप प्राचार्य डॉ.जे.बी.पटवर्धन,डॉ.जे.आर.गुजराथी,डॉ.कल्पना पाटील यांनी मार्गदर्शन केले तर परीक्षेच्या आयोजनात सी.सी.एम.सी प्रमुख डॉ.विजय तुंटे, शिखर स्पर्धा परीक्षा केंद्राचे अडव्होकेट चंद्रभान पाटील,डॉ.हर्षवर्धन जाधव,प्रा.आर.सी.सरवदे,डॉ.माधव भुसनर,डॉ.मुकेश भोळे,ग्रंथपाल दिपक पाटील,डॉ.नलिनी पाटील,प्रा.जयेश साळ्वे,प्रा.बालाजी कांबळे,प्रा.आकाश पाटील,दिलिप शिरसाठ,मेहूल ठाकरे,साहिल खाटीक,मुकेश राजपूत,दर्शन पाटील,सुशिल धनगर आदिनी सहकार्य केले.
