जळगाव मिरर | २९ जानेवारी २०२४
राज्यातील अनेक मोठ्या शहरात नेहमीच खून, बलात्कार, गुन्हेगारीच्या घटना नियमित घडत आहे. आता ठाण्यातील समता नगर परिसरात पाइपलाइन मार्गावर २८ वर्षीय तरुणाची हत्या झाल्याची घटना घडली आहे. ठाण्यातील समता नगर या ठिकाणी हत्या झालेल्या या युवकाचं नाव तानाजी शिंदे असं आहे. समता नगर येथील पाईप लाईन परिसरात सदरचा व्यक्तीचा मृत्यू झाल्याचा प्रकार सकाळी समोर आला आहे. या प्रकरणी वागळे इस्टेट पोलीस पुढील तपास करीत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, ठाण्यातील या हत्येप्रकरणी त्याच्या एका मित्राला वागळे इस्टेट पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. वागळे पोलीस ठाण्याच्या नियंत्रणाला समता नगरच्या पाइपलाइन परिसरात एका व्यक्तीचा मृतदेह पडल्याचा फोन आला होता. वागळे पोलीस स्टेशन आणि फॉरेन्सिक विभागाचे पथक तातडीने घटनास्थळी पोहोचले. या तपासादरम्यान आम्हाला कळले की, पहाटे पाच वाजता तानाजी शिंदे (वय 28) याच्या मित्रांनी घरातील चौकटीच्या लाकडाने प्रहार करून त्याची हत्या केली, अशी माहिती पोलिसांनी दिली. पोलीस घटनास्थळाची संपूर्ण तपासणी करत आहेत. घटनास्थळी असलेले पुरावे जप्त करण्यात आले आहेत.