जळगाव मिरर / १५ फेब्रुवारी २०२३
श्री क्षत्रिय अहिर शिंपी समाज हितवर्धक संस्था संचलित जळगांव शहर शिंपी समाज युवक मंडळाच्या वतिने दिनांक १६ फेब्रुवारी ते १९ फेब्रुवारी २०२३ दरम्यान शिंपी समाज प्रिमियर लीग सिजन २ टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे भव्य आयोजन केले असून उद्या दिनांक १६ फेब्रुवारी जि.एस. ग्राऊंड (शिवतिर्थ मैदान) येथे सकाळी ९.०० वाजेला सामन्याचे शुभारंभ व उदघाटन जळगांव शहराचे आमदार सुरेश (राजूमामा) भोळे यांच्या हस्ते होईल. या प्रसंगी समाज अध्यक्ष श्री. राजेंद्रकुमार सोनवणे, उपाध्यक्ष श्री विवेक जगताप, जिल्हाध्यक्ष श्री. बंडूनाना शिंपी, अ. भा. युवक कार्याध्यक्ष : संदिप सोनवणे, जिल्हा महिलाध्यक्ष सौ. नयनाताई निकम, जिल्हायुवक अध्यक्ष : श्री. तुषार शिंपी, शहर युवक अध्यक्ष श्री. जितेंद्र शिंपी, SPL प्रमुख सुमित अहिरराव, श्री. प्रमोद शिंपी, श्री. चेतन खैरनार, तसेच मान्यवरांच्या उपस्थित सामना सुरू होईल. सदर या शिंपी समाज प्रिमियर लीग २ मध्ये १२ संघ सहभाग होणार असून सदर टिमला खालीलप्रमाणे नाव देण्यात आले आहे.
१) शिंपी वॉरियर्स २) शिंपी पलटन ३) शिंपी डायनामेंटस ४) शिंपी स्ट्रायक्रस ५) शिंपी योध्दा ६) शिंपी नाइट ७) शिंपी अचीवर्स ८) शिंपी कॅपीटल ९) शिंपी थंडर १०) शिपी ब्लास्टर ११) शिंपी सुपर किंग १२) शिंपी जायंटस असे संघाचे नावे आहेत येत्या ४ दिवसामध्ये ३३ सामने होणार असून फायनल सामना १९ फेब्रुवारी रोजी दुपारी ४.०० वा शिव जयंती दिवशी होणार आहे.
समाजातील युवकांना क्रिडा या माध्यमातून एकत्र आणण्याचे कान शिपी समाज जळगांव शहर युवक मंडळाने केलेले असून हा अभिनव उपक्रम राबवित असल्याने SPL 2 चे नियोजन गेल्या २ महिन्यापासून सुरु असून युवक मंडळाचे पदाधिकारी / कार्यकर्ते अथक परिश्रम घेत आहे. यामध्ये सचिव हेमंत शिंपी, SPL 2 कोषाध्यक्ष सागर देवरे, कार्याध्यक्ष अॅड. नुषण सोनवणे, कोषाध्यक्ष चेतन नेरपगार, परेश जगताप, राकेश शिंपी, मयुर शिंपी, जिगनेश सोनवणे, विशाल देवरे, उल्हास देवरे, सागर (चार्ली) शिंपी, निलेश शिंदे, योगेश सोनवणे, गणेश सोनवणे, नयन भांडारकर, निलेश चव्हाण, निखिल सोनवणे, यशवंत शिंपी, निलेश जगताप, शुभम खैरना, कल्पेश खैरनार, ऋषिकेश शिंपी, हितेश देवरे, उदय शिंपी, अशोक सोनवणे, केतन मेटकर, प्रमोद कापुरे, अमित जगताप, स्वप्निल भांडारकर, निलेश कापुरे, प्रशांत सोनवणे, शंतनु जगताप, धर्मेंद्र जगताप, उदय शिंपी, राकेश बाविस्कर, पराग मांबरे आदी समाजबांधव आहेत.
