अमळनेर : विक्की उत्तम जाधव
खान्देश शिक्षण मंडळ संचलित प्रताप कॉलेज(स्वायत्त),अमळनेरला करिअर कट्टा या युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी आयोजित विभागीय स्पर्धेत राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाला आहे.करिअर कौन्सेलिंग संबंधी वर्षभर राबविलेल्या उल्लेखनीय कार्या बद्दल महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग व महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान केंद्र यांच्या वतिने प्रताप कॉलेजला गौरवचिन्ह व प्रमाणपत्र देत मा.शैलेंद्र देवळाणकर(संचालक,उच्च शिक्षण विभाग),प्रा.राजशेखरन पिल्ले(कुलगुरु,सोमय्या विद्यापीठ विद्या विहार संकुल,मुंबई),मा.प्रफुल्ल पाठक(उर्जा कोशल्य कौन्सिल,दिल्ली),मा.यशवंत शितोळे(प्रमुख,एम.आय.टी.एस.सी) यांच्या शुभ-हस्ते सन्मानित करण्यात आले.या प्रसंगी करिअर कौन्सिलिंग सेंटरचे प्रमुख डॉ.विजय तुंटे,डॉ.हर्षवर्धन जाधव उपस्थित होते.
या वेळी शासना सोबत कौशल्य विकास कोर्सेस राबविण्याचा करार करण्यात आला.गेले वर्ष भर राबविलेल्या उपक्रमात खा.शि.मंडळाचे कार्याध्यक्ष हरी भिका वाणी,कार्योपाध्यक्ष योगेश मुंदडे,संचालक डॉ.संदेश गुजराथी,डॉ.अनिल शिंदे,सी.ए.निरज अग्रवाल, प्रदीप अग्रवाल,विनोद पाटील,कल्याण पाटील,संस्थेचे चिटणीस डॉ.ए.बी.जैन,माजी प्राचार्य डॉ.पी.आर.शिरोडे,प्र.प्राचार्य डॉ.एम.एस.वाघ,डॉ.जयेश गुजराथी,डॉ.जे.बी.पटवर्धन,डॉ.जी.एच.निकुंभ,डॉ.कल्पना पाटील,प्रा.उल्हास मोरे यांनी मार्गदर्शन केले. प्रस्तुत उपक्रमांत सातत्याने सहकार्य करणारे डॉ.एच.डी.जाधव, प्रा.आर.सी.सरवदे,डॉ.माधव भुसनर,डॉ.ज्ञानेश्वर मराठे,ग्रंथपाल दिपक पाटील, डॉ.अमित पाटील,डॉ.नलिनी पाटील,डॉ.मुकेश भोळे,प्रा.वृषाली वाकडे,डॉ.रवी बाळसकर,प्रा.जयेश साळवे,प्रा.बालाजी कांबळे,प्रा.सचिन
पाटील,प्रा.सुनिल पाटील,प्रा.अमृत अग्रवाल,प्रा.देवेंद्र तायडे,प्रा.प्रशांत ठाकुर,डॉ.अनिल झळके,प्रा.रोहन गायकवाड,प्रा.ज्ञानेश्वर कांबळे,डॉ.विलास गावित,श्री.राकेश निळे,श्री.विजय ठाकरे,प्रा.सोनुसींग पाटील,डॉ.राखी घरटे,दिलिप शिरसाठ,मेहूल ठाकरे आदिनी अभिनंदन केले आहे.