
जळगाव मिरर | ४ जुलै २०२४
डंपरचे ब्रेक अचानक फेल झाल्याचे लक्षात येताच, चालकाने प्रसंगावधन राखत भरधाव भरधाव वेगात असलेला डंपर दुभाजाकावर चढवून थांबवला. यामध्ये कुठलीही हानी झालेली नसून कोणालाही दुखापत देखील झाली नाही. हा थरकाप उडविणारा थरार बुधवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास आकाशवाणी चौकात घडला.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील ईच्छादेवी चौकाकडून आकाशवाणी चौकाकडे (एमएच १९, जे ०६६९) क्रमांकाचा स्टोन क्रशरचे डंपर बुधवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास भरधाव वेगाने जात होते. यावेळी डंपरचे ब्रेक फेल झाल्याचे चालकाच्या लक्षात आले. यावेळी चालकाने प्रसंगावधन राखत भरधाव वेगाने असलेले डंपर हे तात्काळ सुमारे एक ते दीड फुट उंच असलेल्या दुभाजकावर चढविले. त्यामुळे डंपरचा वेग कमी होवू डंपर जागीच थांबले. या घटनेमुळे सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नसून कुठलीही हानी झालेली नाही





















