जळगाव मिरर | १२ फेब्रुवारी २०२५
जालना येथील बदनापूर तालुक्यातील मेव्हणागावात आकाश बबन जाधव (२२)या तरुणाचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत आढळला होता. बहिणीसोबत प्रेमसंबंध असल्याच्यासंशयावरून दोन सख्ख्या भावांनी गळा आवळून आकाशचा खून केला. नंतर पुरावा नष्ट करण्यासाठी दुचाकीतून पेट्रोलने मृतदेह जाळला,असे पोलिस तपासात उघड झालेआहे.
बालाजी मिसाळ (२८),गणेश मिसाळ (३१) अशीआरोपींची नावे आहेत. खून झाला त्या रात्री आरोपींच्याघराकडे मृत तरुण मोबाइल टॉर्चच्याइशाऱ्याने गेला होता. त्याच टॉर्चच्या”क्लू’ वरून पोलिसांनी हा खूनउघड केला आहे. दरम्यान, एकाआरोपीने गावातील अजून तीन जणखुनात सहभागी असल्याचेपोलिसांना सांगितले होते. परंतु, त्यातिघांचा खुनाशी संबंध नसल्याचेतपासात समोर आले.
मेव्हणा गावात ८ फेब्रुवारी रोजीआकाश जाधव याचा अर्धवटजळालेल्या अवस्थेत मृतदेहआढळून आला होता. या प्रकरणातबदनापूर ठाण्यात खुनाचा गुन्हादाखल झाला होता. दरम्यान,पोलिसांनी खोलवर जाऊन तपासकेला असता दोन सख्या भावांनीचहा खून केल्याचे समोर आले आहे.पोलिस निरीक्षक पंकज जाधव,सुदाम भागवत यांनी उलगडा केला. खून करण्यासाठी एका भावाने दुसऱ्या भावाला त्याठिकाणी बोलावून घेतले. यानंतर दोन जणांनी गळाआवळून अगोदर खून केला. यानंतर पुरावा गळाआवळल्याचा पुरावा राहू नये म्हणून बॉटलमध्येदुचाकीतील पेट्रोल काढून मृतदेह शेततळ्याच्या मोकळ्याजागेत आरोपींनी जाळला. त्यानंतर दोघे आरोपी निघूनगेले. सकाळी अर्धवट जळालेला मृतदेह आढळला होता.
खून करण्यासाठी अजून तीन जणांचा सहभाग असल्याचेआरोपींमधील एक जण सांगत होता. यामुळे पोलिसांनीतिघांनाही ताब्यात घेतले. पोलिसांनी प्रत्यक्ष तपास केलाअसता ताब्यात घेतलेल्या तीन जणांचा सहभाग नसल्याचेसमोर आले. पोलिसांच्या या सतर्कतेने तीन जण आरोपीहोता-होता वाचले. वैयक्तिक वादातून तीन जणांची एकआरोपीने नावे घेतल्याचे पुढे आले.