जळगाव मिरर | १६ ऑगस्ट २०२४
राज्यातील अनेक महामार्गावर अपघाताच्या भीषण घटना घडत असतांना नुकतेच समृद्धी महामार्गावर वाशिम जिल्ह्यातील वनोजा-शेलुबाजार जवळ असलेल्या IC9 टोल प्लाझा जवळ दि.15 ऑगस्ट रोजी 12 वाजताच्या दरम्यान कारचा भीषण भीषण अपघात झाला आहे. यामध्ये कारमधील वडील व मुलाचा जागीच मृत्यू झाला असून, आई आणि मुलगी गंभीर जखमी झाले आहे. हा अपघात कार चालकाला झोप लागल्यामुळे घडल्याची माहिती मिळत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार समृद्धी महामार्गाने मुंबई वरून वर्धा येथे जात असताना MH 43 BK 6284 क्रमांकाच्या कारने समृद्धी महामार्गावर उभ्या असलेल्या MH 04 HD 9981 क्रमांकाच्या आयशर ट्रकला मागच्या बाजूला जोरदार धडक दिली. यामध्ये कारचा समोरचा भाग पूर्ण चुरा झाला असून, कारमधील चालक पराग सोनार वय 45, अनिस सोनार वय 9, याचा जागीच मृत्यू झाला आहे. तर दिपाली सोनार वय 40, रसूल सोनार वय 15 राहणार नवी मुंबई आणि ट्रक चालक नवनाथ वायचाळे जखमी झाले असून, यांना शेलुबाजार येथिल प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठविण्यात आले आहेत.
यावेळी समृद्धी महामार्गाच्या बाजूला शेतात काम करत असलेल्या शेतकऱ्यांनी अपघात झाल्याचे दिसताच त्यांनी याची माहिती संबंधित यंत्रणेला दिली. यांनातर अपघात स्थळी समृद्धी महामार्गावरील रेस्क्यू टीम यांनी दाखल होऊन, कारचे काच फोडून जखमींना बाहेर काढून, समृद्धी महामार्गावरील 108 रुग्णवाहिकेद्वारे अकोला येथे उपचाराकरिता पाठविले. कारची समोरची बाजू पूर्ण चुरा झाली असल्यासाने मृत चालकाला बाहेर काढता येत नव्हते. रेस्क्यू टीमने ग्राइंडर व ईतर यंत्राच्या साह्याने अर्ध्या ते एक तासानंतर बाहेर काढले.
सदर ट्रक चालक ट्रकमध्ये बिघाड झाल्यामुळे, महामार्गावर ट्रक बाजूला उभा करून ट्रक खाली जाऊन काम करत होते. याचवेळी कारने ट्रकला मागून जोरदार धडक दिली. यामुळे ट्रक सोमोर गेला आणि त्याखाली असलेला ट्रक चालक ही फेकल्या गेल्यामुळे तेही जखमी झाले आहे. अपघाताची माहिती मिळताच मंगरुळपीर पोलिस स्टेशनचे ठाणेदार सुधाकर आढे, पीएसआय दिनकर राठोड, पोलीस कर्मचारी प्रमोद वानखेडे, रन्नु रायलीवाले, संजय घाटोळे, सुरेंद्र तिखिले, समृद्धी महामार्गाचे पोलिस उपनिरीक्षक मधुकर राठोड, आनंद काकडे, यांनी घटनास्थळी दाखल होऊन भेट दिली.