जळगाव मिरर / २९ एप्रिल २०२३ ।
देशात बदलत्या हवामानामुळे अनेक राज्यात अवकाळी पावसाचा हाहाकार माजला आहे. अशीच काहीशी परिस्थिती राज्यातील छत्रपती संभाजी नगर नंतर जळगावकरांना आता भर उन्हाळ्यात ‘थंडा थंडा-कुल कुल’ असे चित्र अनुभवायला मिळाली आहे. जळगाव शहरात दुपारपासून जोरदार वादळ वारा व पावसाला सुरवात झाला. यात काही ठिकाणी झाड पडले तर अनेक रस्त्यांवर लागलेले होर्डींग देखील वादळामूळे तुटून रस्त्यांवर पडलेले होते. तर दुपारी तीन वाज्यापासून पावासाला जोरदार सुरवात झाली होती.
गेल्या काही दिवसापासून अवकाळी पाऊस जळगाव जिल्ह्यात सुू आहे. अनेक ठिकाणी गारा, पाऊस तसेच सोसाट्याच्या वार्यामुळे मोठ्या प्रमाणात पिकांचे तसेच घरांचे नुकसान झाले आहे. गुरूवारी मोहाडी गावाजळव जोरदार वार्यामुळे मोठा ट्रॉला ट्रक पलटून त्यात दोन जण ठार झाल्याची घटना घडली. शुक्रवारी दुपारी दोन वाजता अचानक आकाशात ढग दाटून येत जोरदार वार्याला सुरवात झाली. त्यामुळे रस्त्यांवरून जाणारे, रस्त्यांवर थाटलेले व्यवसायीकांची एकच धावपळ उडाली. तर मार्च, एप्रिल महिन्यात जळगाव शहराचे तापमानात प्रचंड वाढ झाली होती. तापमानाचा पारा 43 अंशापर्यत गेले होते. गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील तापमानात घट झालेली असून तापमान कमाल 36 अंश सेल्सिअस ते किमान 23 ते 25 डिग्री पर्यंत गेले होते.