
अमळनेर : विक्की उत्तम जाधव
जातीचे दाखल्या संदर्भात शासनाने घातलेल्या अटी आणि शर्ती मुळे कंजर भाट समाजाच्या प्रत्येक नागरिकाला अडचण निर्माण आहे या पार्श्वभूमीवर विकास कृती समितीचे मुख्य सल्लागार मूरचंद हरी भाट यांच्या नेतृत्व खाली अमळनेर कंजर भाट समाजाचे सरपंच सावन बाटुंगे व अंमळनेर कंजर भाट समाज युवा शक्ती बहुउद्देशीय संस्थेमार्फत २३ शुक्रवार रोजी प्रांताधिकारी महादेव खेडकर यांना निवेदन देण्यात आले.
राज्य शासनाकडून शासन आपल्या दारी या योजनेच्या माध्यमातून आमच्या समाजाचा प्रत्येक नागरिकाला जातीचा दाखला 2018 च्या शासन निर्णय प्रमाणे स्थानिक गृह चौकशी करून आणि 61 च्या पुराव्याची अट रद्द करून सर्वांना जातीचे दाखले देण्यात यावे शासनाने या योजनेद्वारे ही संकल्पना राबवावी जेणेकरून भटक्या आणि विमुक्त समाजाला न्याय मिळेल भटक्या आणि विमुक्त विकास विभागाचे मंत्री यांना या संदर्भात समाजाच्या जातीचे दाखले उपलब्ध करून द्यावे या आशयाची मागणी निवेदनातून समाजातील नागरिकांनी केली आहे यावेळी अमळनेर कंजरभाट समाज युवाशक्ती बहुउद्देशीय संस्था मार्फत निवेदन देण्यात आले. यावेळी श्रावण बाटूगे, सरजू अभंगे, राहुल कंजर, टोनी बागडे, गोकुळ बागडे, राकेश अभंगे यांच्यासह आदी समाजबांधव उपस्थित होते.





















