जळगाव मिरर | १८ ऑगस्ट २०२४
श्री क्षत्रिय अहिर शिंपी समाज हितवर्धक संस्था संचलित युवक व महिला मंडळ जळगाव याच्या वतिने देशाचा व संस्थेचा 78 वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला सर्वप्रथम सकाळी 8 वाजता शिंपी समाजाच्या शेठ फत्रू लक्ष्मण शिंपी वस्तीगृह येथे ध्वजवंदन व भारत मातेचे पूजन करण्यात आले. धजवंदन जळगाव जिल्हाध्यक्ष श्री बंडू नाना शिंपी अ भा निमंत्रित विश्वस्त पी टी अण्णा शिंपी यांच्या हस्ते करण्यात आले व भारत मातेचे पूजन वस्तीग्रह प्रमुख दिलीप सोनवणे संस्था अध्यक्ष राजेंद्रकुमार सोनवणे उपाध्यक्ष विवेक जगताप व पदाधिकारी यांनी केले त्यानंतर ठीक 9 वाजता शिंपी समाज व वसतिगृह येथून भव्य तिरंगा रॅलीला सुरुवात करण्यात आली.
77 फूट असलेल्या भारताच्या तिरंगा ध्वजाचा सन्मान म्हणून समाज बंधू भगिनी युवकांनी आपल्या हातात धरून अडीच किलोमीटरचा पाई प्रवास करून याचा समारोप शिंपी समाजाच्या श्रीमती मनोरुबाई जगताप सामाजिक सभागृह येथे सकाळी 11:30 वाजता समारोप झाला रॅलीचे मुख्य आकर्षण सर्व महिला भगिनी ,पूरूष ,युवक,यानी पांढरे कपडे एक सारखे परिधान केले होते भारत माता , वंदे मातरम चा जय घोष करत रॅली अतिशय शांततेने एकाग्रतेने संपन्न झाली दुपारी 3 वाजता संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये संस्था अध्यक्ष राजेंद्रकुमार सोनवणे यांनी वर्ष 2023 ,24 चा लेखाजोखा समाज माऊली पुढे सादर केला.
या प्रसंगी 300 विद्यार्थ्यांना आमदार सुरेश भोळे (राजुमामा) यांच्या वतीने वह्या व रजिस्टर वाटप करण्यात आले या कार्यक्रमास कोषाध्यक्ष चेतन खैरनार प्रसिद्धीप्रमुख मनोज भांडारकर व वस्तीगृह प्रमुख दिलीप सोनवणे सहसचिव दीपक जगताप प्रमुख अतिथी रविकिरणजी कोंबडे साहेब शरदराव बिरारी व्ही ओ सोनवणे हे होते तसेच सदस्य मुकुंद मेटकर सतीश जगताप सुरेश सोनवणे प्रदीप शिंपी अरुण मेटकर गणेश सोनवणे सुनील बाविस्कर दिलीप भांबरे दत्तात्रय वारुळे युवक अध्यक्ष जितेंद्र शिंपी महिला अध्यक्ष सौ रेखाताई निकुंभ या सह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाच्या शेवटी सर्वाना खाऊ वाटप करन्यात आला