जळगाव मिरर | २७ ऑगस्ट २०२४
यावल तालुक्यातील किनगाव खुर्द येथील रहिवाशी ७९ वर्षीय इसमाने आडगाव रस्त्यावरील शेत विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना दि. २६ ऑगस्ट सोमवार रोजी सकाळी ९ वाजता उघडकीस आली. नागरिकांनी शेतात धाव घेतली व वृध्दास विहिरीतुन काढून यावल ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले या ठिकाणी डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले. तेव्हा याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, किनगाव खुर्द ता. यावल येथील रहिवाशी दगडू काशीराम चव्हाण (वय ७९) वर्ष या वृद्ध इसमाने आडगाव रस्त्यावरील रमेश विठ्ठल चौधरी यांच्या शेत विहिरीत उडी घेतली. हा प्रकार निदर्शनास येताच नागरीकांनी शेतात धाव घेतली व त्यांना तातडीने विहिरीतून बाहेर काढण्यात आले आणी यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये आणण्यात आले. यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत जावळे यांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले. तपास पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार उमेश महाजन करीत आहे.