जळगाव मिरर | १६ जुलै २०२४
जळगाव तालुक्यातील कुसुंबा गावातील एकाचे बंद घर फोडून सोन्याचे व चांदीचे दागिने आणि रोकड असा एकूण २ लाख ३४ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेणाऱ्या संशयित आरोपीला एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरापासून जवळ असलेल्या कुसुंबा येथील रहिवासी सौभाग्य चित्तरंजन सेनापती (वय-२८) हा तरुण आपल्या पत्नीसह वास्तव्यास असून दि.२ जुलै ते ६ जुलैच्या कालावधीमध्ये त्यांचे घर बंद असताना चोरट्यांनी त्यांचे बंद घर फोडून घरातून सोन्याचे व चांदीचे दागिने तसेच लोक रक्कम असा एकूण २ लाख ३४ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान या गुन्ह्यातील संशयित आरोपी अविनाश पाटील याने केल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने कारवाई करत संशयित आरोपी अविनाश पाटील याला अटक केली आहे.
त्याच्याकडून चोरी गेलेल्या मुद्देमाल पैकी २ लाख १९ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक महेश्वरी यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम, पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे, दीपक जगदाळे, सहायक फौजदार अतुल वंजारी, पोलीस हेडकॉन्स्टेबल किरण पाटील, पोलीस नाईक, किशोर पाटील, गणेश ठाकरे, सिद्धेश्वर टापकर, चंद्रकांत पाटील, साईनाथ मुंडे यांनी केली आहे.