जळगाव मिरर | ५ सप्टेबर २०२४
भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन हे प्रसिद्ध शिक्षक आणि तत्त्वज्ञ होते त्यांचा 5 सप्टेंबर रोजी असणारा जन्मदिन हा शिक्षक दिन म्हणून सर्वत्र साजरा करण्यात येतो
ज्ञानार्जनाच्या पवित्र कार्यातून उद्याचे सुजाण संस्कारक्षम नागरिक घडवणाऱ्या शिक्षकांप्रती आदरयुक्त भावना व्यक्त करणे आणि शिक्षकांच्या कठोर परिश्रम, समर्पण आणि ज्ञानाचा सन्मान करण्याचा उद्देश डोळ्यासमोर ठेऊन शिक्षक दिनाच्या निमित्ताने राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी मुक्ताईनगर शहरातील आदर्श इंग्लिश मिडीयम स्कुल ,डॉ जगदीश पाटिल इंग्लिश मिडीयम स्कुल,अलफलाह उर्दू हायस्कुल आणि जे. ई. स्कुल ज्युनि कॉलेज येथे भेट देऊन सर्व गुरुजनांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आणि आपल्या प्रगल्भ ज्ञानातून मुलांच्या शैक्षणिक जडणघडणीत योगदान देऊन उद्याच्या संस्कारक्षम सुजाण नागरिक घडवण्याच्या शिक्षकांच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करून त्यांचे आभार मानले.
यावेळी रोहिणी खडसे म्हणाल्या माजी राष्ट्रपती,शिक्षक, तत्त्वज्ञ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची आज जयंती आजचा दिवस हा शिक्षक दिन म्हणून आपण साजरा करतो आधुनिक युगाची आव्हाने लक्षात घेवून, शाळेत येणाऱ्या मुलांचे कुतुहलाचे क्षमन करीत त्यांना ज्ञानदान करण्याचे पवित्र कार्य करणारे ‘शिक्षक’ हे भावी पिढीचे शिल्पकार आहेत. क्रमिक पुस्तकातील शिक्षणासोबतच आपल्या विद्यार्थी – विद्यार्थिंनींचे अभ्यासोत्तर ज्ञान, नवनवीन तंत्रज्ञानाची ओळख, क्षमतांचा विकास करून विद्यार्थ्यांमध्ये संस्कार व नैतिक मूल्ये रुजवून विद्यार्थ्यांच्या आयुष्याला आकार, आधार आणि अमर्याद ज्ञान देण्याचे कार्य आपण सर्व शिक्षक करत असतात तुमच्या या कार्यातूनच उद्याचे सुजाण संस्कारक्षम नागरिक घडतात त्यामुळे तुमचे समाजावर अनंत ऋण आहेत हि सुद्धा एकप्रकारे देशसेवाच असुन शिक्षकांच्या या अमुल्य योगदाना बद्दल रोहिणी खडसे यांनी शिक्षकां प्रति आभार व्यक्त केले.
यावेळी शिक्षक बांधव विद्यार्थी उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्रातील मुक्ताईनगर, रावेर, बोदवड तालुक्यातील सर्व शाळा महाविद्यालयातील शिक्षकांची भेट घेऊन रोहिणी खडसे यांच्या तर्फे सर्व शिक्षकांना शिक्षकांच्या कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणाऱ्या शुभेच्छा संदेशाचे वितरण केले.