जळगाव मिरर | १० ऑक्टोबर २०२४
शहरातील एका रुग्णालयातून काम संपवून घरी परतत असताना एका अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत यावल तालुक्यातील आडगाव येथील राजेश दिलीप पाटील (वय ३२) या युवकाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी रात्री ११ वाजता ममुराबाद गावाजवळ घडली. या प्रकरणी जळगाव तालुका पोलिस ठाण्यात अज्ञात वाहन चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, यावल तालुक्यातील आडगाव येथील राजेश दिलीप पाटील हा तरुण शहरातील एका खासगी रुग्णालयातील पॅथोलॉजी लॅबमध्ये कामाला होता. रात्री काम संपवून तो आपल्या दुचाकीने घरी आडगावला जायला निघाला. ममुराबाद गावाच्या पुढे यावलकडून जळगावकडे जाणाऱ्या एका अज्ञात वाहनाने राजेशच्या दुचाकीला धडक दिली.
त्यात राजेशला गंभीर दुखापत झाली. त्यात राजेशचा जागीच मृत्यू झाला. ममुराबाद येथील काही तरुणांनी रस्त्याला कडेला पडलेल्या राजेशचा मृतदेह पाहिल्यानंतर याबाबतची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी राजेशचा मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आला. तसेच मृतदेहाची ओळख पटल्यानंतर आडगाव येथील पुरुषोत्तम भालेराव या युवकाला अपघात झाल्याचे सांगितले.