जळगाव मिरर / ४ मार्च २०२३ ।
कोविड महामारीनंतर महाविद्यालये पुन्हा फुलू लागल्या आहे. स्नेहसंमेलनाचा जल्लोष बघावयास मिळतो आहे. स्नेहसंमेलन म्हणजे व्यक्त होण्याच हक्काचं व्यासपीठ मग ते नृत्य असो वा गीत..एकांकिका असो…मिमिक्री असे व्यक्तीमत्वाचे पैलू या स्नेहसंमेलनात उलगडत जातात.यासाठी स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांनी धमाकेदार सादरीकरण केले. घुमर… फिरी नाच पोरी फिरी नाच… काली चिडी.. या गाण्यावर तरुणाई थिरकली.
सामी… सामी… वाजले की बारा… एका साकी एका साकी… झुमका वाली पोर स्नेहसंमेलनात धमाकेदार सिनेगीतावर विद्यार्थ्यांनी धमाल केली. मु.जे.महाविद्यालयाच्या चैतन्य 2023 स्नेहसंमेलनाचे उद्घाटन बँक ऑफ महाराष्ट्रच्या झोनल मॅनेजर रेश्मी रेखापती,संयोजक प्रा.के.बी.महाजन, प्राचार्य संजय भारंबे सर्व विद्याशाखा आणि समिती प्रमुख उपस्थित होते.
महाविद्यालयात उत्साहाचे जल्लोषाचे वातावरण बघावयास मिळाले. विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या हस्तकला, रांगोळी, चित्रकला,पोस्टर्स, फोटोग्राफी ,मेहंदी, विविध छंद व वस्तूंची सौंदर्यपूर्ण प्रदर्शनी हिने उपस्थितांची मने जिंकली. युवा खाना-खजाना या उपक्रमात 30 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी पाककलेचे उत्कृष्ट व रुचकर पदार्थांचे स्टोल मांडले. तरुणाईने हास्य प्रधान खेळांचा आस्वाद घेत स्वादिष्ट पदार्थांचा आस्वाद घेतला.
चैतन्य 2023 फूड फेस्टिव्हल निकाल – प्रथम बक्षीस: उज्वला सुभाष बारी. ( बाप्पा खजुराचे मोदक) द्वितीय बक्षीस खान्देशी तडका: शुभांगी संतोष कुमावत,प्रवीण कैलास पवार, कांचन सोनवणे. तृतीय बक्षीस: स्वीट कॉर्नर (गुलाबजाम) प्रिती बाबूलाल भोई , सर्वप्रथम उत्तेजनार्थ: तिखट गोड पाहुणचार- पूर्वा राजू भोई,श्रेया रितेश पांडे,अर्पिता नितीन पाटील,जान्हवी नितीन पाटील फेन्सी ड्रेस स्पर्धा – चैतन्य 2023 स्नेह संमेलनात फेन्सी ड्रेस स्पर्धेत एकूण 11 विद्यार्थ्यांनी राज्यांच्या वेषभूषा परिधान केल्या होत्या. महाराष्ट्राच्या राजमाता जिजाऊ, धनुर्धारी एकलव्य, आणि स्त्री शिक्षणाच्या प्रणेेत्या सावित्रीबाई फुले यांची देखील वेषभूषा साकारली होती.
फेन्सी ड्रेस स्पर्धा निकाल – प्रथम: संगीता सुनील चंचल (सावित्रीबाई फुले) द्वितीय: रेवती पंढरीनाथ फिरके ( राजमाता जिजाऊ) तृतीय: अमरसिंग बकरे पाडवी(एकलव्य)