जळगाव मिरर / १० मार्च २०२३ ।
आप्पासाहेब विश्वासराव भालेराव प्रतिष्ठानतर्फे १७ या राज्यस्तरीय आंबेडकरी अस्मिता पुरस्कार जाहीर करण्यात आता आहे. पुरस्कार वितरण रविवार दिनांक १२ मार्च रोजी होणार असल्याची माहिती आज पत्रकार परिषद घेत आप्पासाहेब विश्वासराव भालेराव प्रतिष्ठानचे अध्यक्ष शरद भालेराव, हरिश्चद्र सोनवणे, विलास यशवंते, दीपक जोशी, चिंतामण पाटील, प्रबुद्ध भालेराव, कुलदीप भालेराव यांनी दिली.
क्रांतीबा जोतीबा फुले शेजारच्या घरात जन्माला याचे अशी धारणा असणाऱ्या समाजात दलित शोषित समाजाच्या विकासासाठी प्रयत्न करणाऱ्या कार्यकर्त्यांना अवहेलना सहन करावी लागते. मात्र अशा कार्यकत्र्यांशिवाय समाजाचा विकास होणे प्रवय नसते त्यामुळे दलित शोषित समाजाच्या विकासात मोलाचे योगदान देणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना पुरस्कृत करण्याचे कार्य प्रतिष्ठान मार्फत दरवर्षी केले जाते. आजपर्यंत प्रतिष्ठान तर्फे मा.म.देशमुख (नागपूर) अंबक सपकाळे, प्रतापसिंग बोदडे, आम कांबळे (नाशिक), भाऊ थुटे(वर्धा), आशु सक्सेना नागपुरा, संभाजी भगत(मुंबई), सरोज कांबळे (धुळे), आनंद तेलतुंबडे (मुंबई), शाहीर राजेंद्र कांबळे (सोलापूर), सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभा(नवापुर) इत्यादी समाज सेवकांना आंबेडकरी अस्मिता पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. या वर्षाचा सन २०२२ चा १७ वा राज्यस्तरीय भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या क्रांतिकारी विचारधारेतील तत्व आणि मूल्य तसेच शिवरायांच्या जाती धर्मापलीकडे असलेल्या माणुसकीचा इतिहास प्रभावीपणे मांडत परिवर्तनवादी शाहिरी जालस्यातून जन-मानसाचे प्रबोधन करीत व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या “मी भारत बौद्धमय करीन” या भूमिकेला स्वतः धम्मदीक्षा घेऊन फुले-आंबेडकरी चळवळ राबविणारे भीम शाहीर मा.आयु.सीमाताई पाटील (मुंबई) यांना देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. परिस्थिती माणसाला लाचार करते आणि त्या लाचारीतून माणूस दास्यत्वाच्या भूमिकेत शिरतो हे सत्य असले तरी त्यासत्याला खोडून काढण्याची क्षमता ज्यांच्यात असते तोच संविधानाचा खरा साधक असतो. अनंत हाल-अपेष्टा आणि अडचणींवर मात करून फुले-शाहू-आंबेडकरांची विचारधारा आपल्या विद्रोही कवितांच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवत समाजात प्रबोधन घडविणारे मा. आयु. दंगलकार नितीन चंदनशिवे (सांगली) यांना क्रांतीबा ज्योतिबा फुले पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. तसेच राजर्षी शाहू महाराज पुरस्कार बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची धुरा सामाजिक जाणिवेचे भान ठेऊन गेली कित्येक वर्षे या समाजाच्या प्रगती व प्रबोधनाचे कार्य आपल्या सामाजिक कार्यातून करीत असलेले व डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याची धम जिवंत ठेवत फुले-आंबेडकरी चळवळ राबविणारे मा. आयु. अॅड. राजेश झाल्टे हे स्वीकारणार आहेत.
या कार्याक्रमाचे अध्यक्ष स्थानी मा. आयु. संजय आवटे (लोकमत, पुणे) हे भूषवणार असून प्रमुख अतिथी म्हणून मा आ. आयु. शिरीषदादा चौधरी हे राहणार आहेत. रविवार दि. १२ मार्च रोजी सायंकाळी ठीक ६०० वाजता व. वा. जिल्हा वाचनालय सभागृह, जळगाव येथे संपन्न होणार आहे.
