
जळगाव मिरर | १५ जून २०२४
चोपडा तालुक्यातील अडावद येथे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त श्री क्षेत्र उनपदेव येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेना, अडावद तर्फे महाराष्ट्र सैनिकांनी केलें वृक्षारोपण दि:१४ रोजी उनपदेव पर्यटन क्षेत्र येथे राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध प्रकारांची झाडें लावण्यात आली. यावेळी महाराष्ट्र सैनिक व वनश्री दशरथ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वृक्षारोपण करण्यात आले.
पर्यायावर संरक्षण करण्याच्या प्रत्येक दृष्टीने संवर्धन अत्यंत आवश्यक आहे. विविध प्रकारचे वृक्ष लागवड कार्यक्रम झाला.यावेळी महाराष्ट्र सैनिक चेतन पवार, गौरव सोनवणे, चिरंजीव भोई, हर्षल महाजन,अभय पाटील, विक्की पाटील, दुर्गेश चौधरी,यज्ञेश महाजन, यादी उपस्थित होते.





















