जळगाव मिरर | २९ जुलै २०२४
जळगाव शहरातील सदगुरू नगरात महिलेचे बंद घर उघडून घरातून रोख रकमेसह चांदीच्या वस्तूंची चोरी करणाऱ्या दोन सराईत आरोपींना एमआयडीसी पोलीसांनी एमआयडीसी पोलीस हद्दीतून अटक केली आहे. त्यांच्याकडून चोरीचा मुद्देमाल आणि गुन्ह्यात वापरलेली चोरी दुचाकी हस्तगत करण्यात आली आहे. दोघांवर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
मिळालेल्या माहितीनुसार, सद्गुरू नगरात जयश्री मयुर वाणी रा. सद्गुरू नगर, जळगाव या महिला आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. याच परिसरात त्यांच्या आईचे घर देखील आहे. २२ जुलैच्या मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी जयश्री वाणी यांच्या आईचे घर उघडून घरातून १५ हजारांची रोकड आणि चांदीच्या वस्तू असा मुद्देमाल चोरी केली होती.
याप्रकरणी २३ जुलै रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, या गुन्ह्याचा तपास सुरू असतांना ही चोरी रेकॉर्डवरील गुन्हेगार प्रशांत पंडीत साबळे उर्फ चोर बाप्या आणि दोन महिन्यांपुर्वीच एनपीडीए मधून सुटून आलेला रितेश कृष्णा शिंदे उर्फ चिच्या यांनी मिळून केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दिपक जगदाळे, सहाय्यक फौजदार विजय पाटील हे करीत आहेत.