जळगाव मिरर | ७ ऑक्टोबर २०२४
भुसावळ शहरातील वांजोळा रस्त्यावरील प्रेरणानगर फाट्याजवळ बाजारपेठ पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून दोघांना दोन गावठी पिस्तुलांसह जिवंत काडतूस ताब्यात घेतले. त्यांची किंमत सुमारे ५१ हजार आहे. ही कारवाई शनिवारी दुपारी साडेचार करण्यात आली. ताब्यात घेतलेल्या संशयितांचे नावे मुकेश मोहन अटवाल (वय २०) रा. वाल्मीक नगर, भुसावळ, यश किरण बोयत (वय २२), भुसावळ अशी आहेत. याप्रकरणी बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, २० हजार रुपये किमतीचा एक लोखंडी गावठी पिस्टल मॅगझीनसह ग्रीपवर काळ्या रंगाची प्लॅस्टीकची पट्टी असलेला. ३० हजार रुपये किमतीचा एक लोखंडी गावठी पिस्टल मॅगझीनसह ग्रीपवर तपकीरी रंगाची प्लॅस्टीकची पट्टी असलेला. एक हजार रुपये कि.चे दोन जिवंत काडतुस दोघे आरोपीच्या ताब्यात मिळुन आला असा ५१ हजार रुपये किमंतीचा मुद्देमाल मिळून आला आहे.
उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णात पिंगळे भुसावळ भाग भुसावळ यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक राहुल वाघ, पोलिस उपनिरीक्षक मंगेश जाधव, पोहेका विजय बळीराम नेरकर, निलेश बाबुलाल चौधरी, महेश एकनाथ चौधरी, प्रशांत निळकंठ सोनार, अमर सुरेश अढाळे, जावेद शहा हकीम शहा, भूषण सजंय चौधरी, राहुल विनायक वानखेडे अशांनी केली आहे.