जळगाव मिरर / २९ एप्रिल २०२३ ।
जळगाव शहरात दुपारपासून जोरदार वादळ वारा व पावसाला सुरवात झाला. यात काही ठिकाणी झाड पडले तर अनेक रस्त्यांवर लागलेले होर्डींग देखील वादळामूळे तुटून रस्त्यांवर पडलेले होते. तर दुपारी तीन वाज्यापासून पावासाला जोरदार सुरवात झाली होती. तसेच वादळी वाऱ्यामुळे वाघूर धरण पंपिंग स्टेशनचा वीजपुरवठा खंडित होऊन शहराचा पाणीपुरवठा एक दिवस पुढे ढकलला गेला आहे.
गेल्या दोन दिवसांपासून वादळी वाऱ्याने बेळी परिसरात हैदोस घातला आहे. वीजपुरवठा करणारे ५० ते ६० खांब खाली पडले आहेत. दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले होते मात्र, शुक्रवारी देखील पाऊस व वादळाने व्यत्यय आणला. वादळामुळे वाघूर धरण पंपिंग स्टेशन येथील वीज पुरवठा खंडित होण्याचा फटका जळगावला बसला आहे. जळगावमधील सबस्टेशन ते पंपिंप स्टेशनपर्यंत ३० किमी अंतराची वाघूर वीज वाहिनी आहे. बिघाड झाल्यावर पेट्रोलिंग करायला दोन तास लागतात. त्यानंतर दुरुस्तीचे काम हाती घेता येते. या वाहिनीचा ६ ते ७ किमी अंतराचा भाग जंगलातून जातो. यामुळे दुरुस्तीला अधिक वेळ लागतो.
पंपिंग स्टेशनला गुरुवारी ३ तास आणि शुक्रवारी दुपारी २ ते सायंकाळी ५.१५ वाजेपर्यंत वीजपुरवठा बंद होता. त्यामुळे दि. २८ रोजी राहिलेल्या भागाचा पाणीपुरवठा दि. २९ रोजी आणि दि. २९ रोजीचा पाणीपुरवठा दि. ३० रोजी केला जाणार आहे. दि. ३० एप्रिल व दि. १ मे रोजी नियोजित पाणीपुरवठा प्रत्येकी एक दिवसाने पुढे ढकलण्यात आला आहे.